नरेंद्र मोदी होते चहावाला़़!

By admin | Published: May 30, 2014 11:17 PM2014-05-30T23:17:57+5:302014-05-31T00:23:25+5:30

अहमदनगर : नरेंद्र मोदी आता कोण आहेत..... पंतप्रधान, नरेंद्र मोदींच्या आधी कोण होते पंतप्रधान..... डॉ. मनमोहनसिंग, नरेंद्र मोदी आधी कोण होते..... उत्तर मिळाले.... चहावाला!

Narendra Modi was tea tea! | नरेंद्र मोदी होते चहावाला़़!

नरेंद्र मोदी होते चहावाला़़!

Next

अहमदनगर : नरेंद्र मोदी आता कोण आहेत..... पंतप्रधान, नरेंद्र मोदींच्या आधी कोण होते पंतप्रधान..... डॉ. मनमोहनसिंग, नरेंद्र मोदी आधी कोण होते..... उत्तर मिळाले.... चहावाला! पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नांना बच्चेकंपनी उत्तरे देत होती. मोदी यांच्याबाबत मुलांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. निमित्त होते... लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ निमित्त लोकमत बाल विकास मंचने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे! शैक्षणिक प्रदर्शनस्थळी चित्रकला स्पर्धेला लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुलांनी काढलेली चित्रं पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधला. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत मुलांना प्रश्न विचारले आणि ‘चहावाला’ या उत्तराने तेही अवाक झाले. ‘चहावाला ते पंतप्रधान’ असा मोदी यांचा प्रवास शिंदे यांनी उलगडला़ गेम, संगणक, मोबाईल कोण-कोण खेळता? या प्रश्नावर सर्वच मुलांनी हात वर केले़ मात्र लांब उडी, उंच उडी, योगा, व्यायाम कोण कोण करता, या प्रश्नावर सर्वच मुलांचे हात खाली राहिले. ध्येय निश्चित करा, मोठी स्वप्ने पाहा आणि त्यासाठी खूप अभ्यास करा, असा संदेश त्यांनी दिला़

हे आहेत स्पर्धेतील चॅम्पियन

लोकमत बाल विकास मंच सभासदांसाठी सावेडीतील गायकवाड सांस्कृतिक भवन येथे आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे - १ ली ते ४ थी गटात प्रथम क्रमांक हिया हेमंत विटणकर, द्वितीय क्रमांक वैष्णवी अविनाश लबाडे, तृतीय क्रमांक कृष्ण बाळासाहेब झावरे, उत्तेजनार्थ नील नहार व गौरी प्रसाद शिंदे. ५ वी ते ७ वी गटात प्रथम क्रमांक अनुराग फ्रान्सीस पाटोळे, द्वितीय क्रमांक शाल्मली घन:शाम घाणेकर, तृतीय क्रमांक हर्ष खंडेलवाल, उत्तेजनार्थ देवश्री नितीन कुलकर्णी, आर्या रोहित शिदोरे. ८ वी ते १० वी गटात प्रथम क्रमांक अंकित संजय ससाणे, द्वितीय क्रमांक शदाब आमीन काझी, तृतीय क्रमांक अक्षय सुनील वैद्य, उत्तेजनार्थ नेहा गिरीष पितळे, जयश्री ईश्वर गव्हाणे यांना पारितोषिके मिळाली. स्पर्धेसाठी प्रशांत शेकटकर, सचिन घोडे, कैलास ढोरे यानंी परीक्षक म्हणून काम पाहिले़

Web Title: Narendra Modi was tea tea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.