नगर - जामखेड रस्त्यावर भीषण अपघात : एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू,चार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:39 AM2019-03-17T11:39:29+5:302019-03-17T11:46:55+5:30

जामखेड- नगर रस्त्यावर जामखेडपासून जवळच असणा-या पोखरी येथे (ता. आष्टी, जिल्हा-बीड) या ठिकाणी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रक व इर्टीका कारचा समोरासमोर अपघात झाला.

Nagar - Fatal accidents on Jamkhed road: Death of four in a single family, | नगर - जामखेड रस्त्यावर भीषण अपघात : एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू,चार गंभीर

नगर - जामखेड रस्त्यावर भीषण अपघात : एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू,चार गंभीर

googlenewsNext

जामखेड : जामखेड- नगर रस्त्यावर जामखेडपासून जवळच असणा-या पोखरी येथे (ता. आष्टी, जिल्हा-बीड) या ठिकाणी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रक व इर्टीका कारचा समोरासमोर अपघात झाला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महीला व एका सात वर्षीय मुलाचा समावेश आहे. सर्व मृत नादेंड जिल्ह्यातील आहेत. सावरगाव पिरजादे ता.मुखेड, जिल्हा नांदेड येथील सर्वजण रहिवाशी आहेत.
नागेश चमकुरे (ड्रायव्हर), योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे (वय ७ वर्षे), अनिकेत चमकुरे अशी मृतांची नावे आहेत.

Web Title: Nagar - Fatal accidents on Jamkhed road: Death of four in a single family,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.