पी.एफ.साठी नगर कारखाना लिलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:12 PM2018-11-03T12:12:38+5:302018-11-03T12:13:06+5:30

नगर तालुक्यातील एकमेव साखर कारखाना असलेल्या नगर तालुका सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर आता तो भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) थकबाकी वसुलीसाठी लिलावात काढण्यात आला आहे.

Municipal factory auction for PF | पी.एफ.साठी नगर कारखाना लिलावात

पी.एफ.साठी नगर कारखाना लिलावात

Next

मिलिंदकुमार साळवे 
अहमदनगर : नगर तालुक्यातील एकमेव साखर कारखाना असलेल्या नगर तालुका सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर आता तो भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) थकबाकी वसुलीसाठी लिलावात काढण्यात आला आहे.
एकेकाळी सहकारी साखर कारखानदारीचे आगार असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात नगर तालुक्यात एकही साखर कारखाना अस्तित्वात नव्हता. ही बाब लक्षात घेऊन माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी नगर तालुका सहकारी साखर कारखाना सुरू केला. सुरूवातीस काही काळ हा कारखाना चालविल्यानंतर आर्थिक दुष्टचक्रात हा कारखाना अडकला. त्यातून कारखान्यास बाहेर काढण्यासाठी तो खाजगी तत्वावरदेखील चालविण्यास देण्याचा प्रयोग करून पाहण्यात आला. पण हा प्रयोगही फसला. नंतर हा कारखाना बंदच पडला.
सन २०१०-११ च्या सुमारास या कारखान्याचा शेवटचा गळीत हंगाम पार पडला. त्यानंतर घरघर लागलेला हा कारखाना कायमचा आजारी पडला. कारखाना बंद पडल्याने त्याच्या देणेकऱ्यांची संख्या वाढली. महाराष्टÑ राज्य सहकारी बँकेकडून या कारखान्याने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने कारखान्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली. त्यानुसार कारखान्याची काही मालमत्ता विक्रीस काढण्यात आली. कारखाना आर्थिक अडचणीत सापडून दिवाळखोरीत गेल्यानंतर त्याचे अर्थचक्र जागेवरच थांबले. त्यातूनच कारखान्यास कर्मचाºयांचा भविष्य निर्वाह निधी भरणेही अवघड झाले. भविष्य निर्वाह निधी वेळेवर भरण्यात न आल्यामुळे नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कारखान्यास नोटिसा देऊन कायदेशीर कारवाई केली. त्यानंतर कारखान्याने कर्मचाºयांच्या थकलेल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम या कार्यालयाकडे भरली. पण भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने अगोदरच्या थकीत रकमेवर व्याज व दंड आकारणी केली.
या दंड व व्याजाच्या रकमेपोटी कारखान्याकडे १ कोटी ३४ लाख रूपयांची थकबाकी असल्याचे सांगून ही रक्कम भरण्याची मागणी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कारखान्याकडे केली. पण दिवाळखोरीत गेलेल्या या कारखान्यास ही रक्कम भरता आलेली नाही. त्यामुळे आता ही रक्कम वसूल करण्यासाठी कारखाना लिलावात काढण्यात आला आहे.
१५ नोव्हेंबरला आॅनलाइन लिलाव
वाळकी (ता. नगर) येथील नगर तालुका सहकारी साखर कारखाना सहकार खात्याने अवसायानात काढला आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने १ कोटी ३४ लाख रूपयांच्या वसुलीसाठी येत्या १५ नोव्हेंबरला आॅनलाइन लिलाव पुकारला आहे.

 

Web Title: Municipal factory auction for PF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.