संगमनेरात मोटारसायकल रॅली, महिलांचा लक्षणीय सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:19 PM2018-08-09T13:19:53+5:302018-08-09T14:14:14+5:30

क्रांती दिनी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्टÑ बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला संगमनेरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

Motorcycle rally in Sangamner, and significant participation of women | संगमनेरात मोटारसायकल रॅली, महिलांचा लक्षणीय सहभाग

संगमनेरात मोटारसायकल रॅली, महिलांचा लक्षणीय सहभाग

Next

संगमनेर : क्रांती दिनी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्टÑ बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला संगमनेरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅलीला सुरवात करण्यात आली.
यात महिलांचा सहभाग लक्षणीय असून बहुसंख्य मराठा बांधव सहभागी झाले आहेत. गवंडीपुरा, मेनरोड, बाजारपेठ, तेलीखुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक,रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक आदी ठिकाणाहून ही रॅली मार्गस्थ होत आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे रॅलीत सहभागी झाले आहेत. संगमनेरातील मुस्लीम समाजाच्या वतीने सकल मराठा मोर्चास पाठिंबा देण्यात आला आहे.
नाशिक पुणे महामार्गावरील घारगाव, आंबीफाटा येथील तरूणांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. तर वरुडी फाटा याठिकाणीही रास्ता रोको करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू आहे.
 

Web Title: Motorcycle rally in Sangamner, and significant participation of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.