राहुरीजवळ मोटारसायकल-पिकअपचा अपघात; दोघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 07:11 PM2018-01-22T19:11:26+5:302018-01-22T19:11:47+5:30

Motorcycle-pickup accident near Rahuri; Both injured, one's condition serious | राहुरीजवळ मोटारसायकल-पिकअपचा अपघात; दोघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

राहुरीजवळ मोटारसायकल-पिकअपचा अपघात; दोघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Next

राहुरी : राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन चिकित्सालय व कृत्रिम रेतन केंद्राच्या गेटसमोर नगर-मनमाड रोडवर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. विरुद्ध दिशेने जाणा-या पिकअप व्हॅनने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील दोघे तरुण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे़ त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
राहुरीकडून नगरच्या दिशेने हे दोघे तरुण मोटारसायकल (क्रमांक एमएच- १७, एल ९७९३) वरुन जात होते. त्यांची मोटारसायकल राहुरी कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन चिकित्सालय व कृत्रिम रेतन केंद्राच्या गेटसमोर आली असताना विरुद्ध दिशेने जाणा-या एमएच-१७, टी-७५८० या पिकअपने या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील दोघाही तरुणांच्या डोक्याला मार लागला आहे. एका तरुणाच्या डोक्यातून व नाकातून रक्त वाहत होते. हात-पाय फ्रॅक्चर झाल्याचे दिसत होते. परिसरातील नागरिकांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला बोलावून दोघांनाही नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. यातील एकाजणाची प्रकृती गंभीर आहे. संबंधित अपघातग्रस्त पिकअप व्हॅन राहुरी विद्यापीठाच्या सेवेत असून, ही पिकअप व्हॅन रोज अशीच विरुद्ध दिशेने जाते आणि पुढे काही अंतरावर गेल्यानंतर टर्न घेऊन विद्यापीठात जाते, असे स्थानिकांनी सांगितले. या पीकवरही राहुरी कृषी विद्यापीठ असे लिहिलेले आहे. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे अद्याप समजली नाहीत. जखमी तरुण वरवंडी (ता. राहुरी) येथील असल्याचे सांगण्यात येते. 

Web Title: Motorcycle-pickup accident near Rahuri; Both injured, one's condition serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.