निसरड्या रस्त्यावर ‘मनसे’ सत्यनारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 07:43 PM2017-08-23T19:43:34+5:302017-08-23T19:46:21+5:30

कोपरगाव : शहरातील बाजार समिती समोर घसरगुंडी होऊन अपघात घडत असल्याने बुधवारी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीअंगावर चिखल माखून रस्त्याच्या मधोमध सत्यानारायण पूजा केली.

MNS Satyanarayan on the slippery road | निसरड्या रस्त्यावर ‘मनसे’ सत्यनारायण

निसरड्या रस्त्यावर ‘मनसे’ सत्यनारायण

Next
ठळक मुद्देनगरपालिकेचा निषेधबाजार समितीसमोर चिखलात आंदोलन
परगाव : शहरातील बाजार समिती समोर घसरगुंडी होऊन अपघात घडत असल्याने बुधवारी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीअंगावर चिखल माखून रस्त्याच्या मधोमध सत्यानारायण पूजा केली. गोदावरी पेट्रोल पंप ते जुना टाकळी नाका रस्त्यावर नगरपालिकेने खडी व माती मिश्रीत मुरूम टाकल्याने पावसात प्रचंड दलदल तयार झाली आहे. रस्त्याची घसरगुंडी झाल्याने दररोज अनेक अपघात होत आहेत. ठेकेदाराची मनमानी व पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिध्द करताच मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, शहराध्यक्ष सतीश काकडे व अलिम शहा यांनी बुधवारी सकाळी कार्यकर्त्यांसह स्वत:च्या अंगाला चिखल माखून रस्त्याच्या मधोमध सत्यानारायण पूजा घातली. पुजेतील चौरंगास फुलांऐवजी चिखल वाहून अभिषेक करण्यात आला. पालिकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न झाल्यास गणेशोत्सव दरम्यान तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला. काकडे व शहा यांनी पालिकेच्या कार्यपध्दतीवर सडकून टिका केली. या अभिनव आंदोलनात सचिन खैरे, रघु मोहीते, अनिल गाडे, सतीश खरात, संजय जाधव, सुजल चंदनशिव, बंटी सपकाळ, प्रवीण लहिरे, संतोष लहिरे, निलेश काकडे, सुरेश सुपेकर, गणेश जाधव, छोटू पठाण आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. .......................................फोटो-२३०८२०१७केओपी०२ आंदोलन ओळ: कोपरगावच्या बाजार समितीसमोरील निसरड्या रस्त्यात अंगावर चिखल माखून सत्यनारायण पूजा घालताना मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, शहराध्यक्ष सतिश काकडे, अलिम शहा व इतर कार्यकर्ते.

Web Title: MNS Satyanarayan on the slippery road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.