गृह राज्‍यमंत्री दिपक केसरकर घेणार गोळीबारातील जखमी शेतक-यांची भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:20 PM2017-11-17T13:20:19+5:302017-11-17T13:20:28+5:30

Minister of State for Home Deepak Kesarkar will meet the injured farmers | गृह राज्‍यमंत्री दिपक केसरकर घेणार गोळीबारातील जखमी शेतक-यांची भेट 

गृह राज्‍यमंत्री दिपक केसरकर घेणार गोळीबारातील जखमी शेतक-यांची भेट 

googlenewsNext

अहमदनगर :  महाराष्‍ट्र राज्‍याचे गृह (ग्रामीण), वित्‍त व नियोजन राज्‍यमंत्री दिपक केसरकर शुक्रवारी (दि.१६) अहमदनगर जिल्‍हा दौ-यावर येत असून शेवगाव गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांची ते भेट घेणार आहेत. 
शुक्रवारी दुपारी २ वाजता राज्यमंत्री केसरकर येथील शासकीय विश्रामगृहात येतील. त्यानंतर ते दुपारी २.१५ वाजता मॅक्‍स केअर हॉस्‍पीटल येथे आंदोलनात जखमी झालेल्‍या शेतक-यांची विचारपूस करण्‍यासाठी भेट घेतील. त्यानंतर ते तेथून जिल्‍हा पोलिस कार्यालयात दुपारी ३ वाजता जिल्‍हा पोलिस अधीक्षक व संबधित अधिकारी यांच्यासमवेत चर्चा घटनेबाबत चर्चा करणार आहेत. 

Web Title: Minister of State for Home Deepak Kesarkar will meet the injured farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.