पंधरा वर्षांतील सर्वात कमी पाऊस : जिल्ह्यात टँकरने ओलांडली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:43 AM2018-10-31T10:43:40+5:302018-10-31T10:44:07+5:30

गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद यंदा झाल्याने दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर टँकरने शंभरी ओलांडली असून, प्रशासनाने सुमारे २ लाख लोकांना पाण्याची व्यवस्था केली आहे.

The lowest rainfall in fifteen years: 100 mm crossing tanker in the district | पंधरा वर्षांतील सर्वात कमी पाऊस : जिल्ह्यात टँकरने ओलांडली शंभरी

पंधरा वर्षांतील सर्वात कमी पाऊस : जिल्ह्यात टँकरने ओलांडली शंभरी

Next

अहमदनगर : गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद यंदा झाल्याने दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर टँकरने शंभरी ओलांडली असून, प्रशासनाने सुमारे २ लाख लोकांना पाण्याची व्यवस्था केली आहे. अजून हिवाळ्याचे तीन व उन्हाळ्याचे चार असे सात महिने टंचाईचा सामना करायचा असल्याने यंदा टँकरचा उच्चांक नोंदवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ४९७ मिमी आहे. यंदा जून ते आॅक्टोबरअखेर केवळ ३४५ मिमी (६९ टक्के) पावसाची नोंद झाली. जी गेल्या पंधरा वर्षांतील निचांकी नोंद आहे. याआधी २००३ मध्ये ३०३ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर २००४ ते २०१० अशी सात वर्षे जिल्ह्यात ५०० मिमीच्या पुढे पाऊस होऊन सरासरी ओलांडली. पुन्हा २०११, १२, १४ व १५ ही चार वर्षे सरासरीच्या कमी पाऊस झाला. त्यामुळे या चार-पाच वर्षांच्या कालावधीत टँकरची संख्या ३०० ते ५००च्या दरम्यान राहिली. २०१५मध्ये अवघा ३९२ मिमी पाऊस झाल्याने पुढील मे २०१६अखेर प्रचंड टंचाई निर्माण होऊन टँकरची संख्या तब्बल ८२६वर गेली. २०१६ व २०१७मध्ये उच्चांकी ६७८ व ८०३ मिमी पाऊस झाला. त्यामुळे मे २०१७ अखेर अवघे ११४ टँकर सुरू होते. परंतु यंदा भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आॅक्टोबरअखेरच जिल्ह्यात १०१ टँकरने ८५ गावे व ४०१ वाडी-वस्तींच्या सुमारे २ लाख १ हजार ६१ नागरिकांची तहान भागवली जात आहे. पुढील सात महिने पुरेल एवढे पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा, तसेच दुष्काळी उपाययोजना करताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होणार आहे.

सध्या जिल्ह्यात १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जसे प्रस्ताव येतील तसे टँकर मंजूर होत आहेत. सध्याच्या ठेकेदाराची मुदत आॅक्टोबरअखेर संपत आहे. त्यानंतर पुन्हा निविदा काढून टँकरसाठी ठेकेदार निवडले जातील. - जयसिंग भैसडे, नायब तहसीलदार, टंचाई विभाग



२०१७ ८०३ ११४ १००

Web Title: The lowest rainfall in fifteen years: 100 mm crossing tanker in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.