सैन्यदलातील सुभेदाराकडून नगरमधील अनेकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 08:28 PM2018-02-26T20:28:52+5:302018-02-26T20:29:15+5:30

सैन्यदलात नोकरीचे अमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रातील ३०० जणांना सात कोटी रूपयांचा गंडा घालणा-या वाळकी (ता. नगर) येथील सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख (इंजिनिअरिंग रेजिमेंट, तवांग) याने नगरमधील अनेकांना नोकरीच्या अमिषाने गंडा घातल्याचे समजते.

A lot of people cheated by army subhedar in the Ahmednagar | सैन्यदलातील सुभेदाराकडून नगरमधील अनेकांना गंडा

सैन्यदलातील सुभेदाराकडून नगरमधील अनेकांना गंडा

googlenewsNext

अहमदनगर : सैन्यदलात नोकरीचे अमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रातील ३०० जणांना सात कोटी रूपयांचा गंडा घालणा-या वाळकी (ता. नगर) येथील सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख (इंजिनिअरिंग रेजिमेंट, तवांग) याने नगरमधील अनेकांना नोकरीच्या अमिषाने गंडा घातल्याचे समजते.
शेख हा सैन्यदलात सुभेदार पदावर कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन त्याने एजंटामार्फत उत्तर महाराष्ट्रातील ३०० तरूणांकडून पैसे घेऊन त्यांना लष्करात नोकरी देण्याचे अमिष दाखविले. पैसे घेऊनही नोकरी मिळत नसल्याने दोन महिन्यापूर्वी पाचोरा (जि. जळगाव) परिसरातील तरूण वाळकी येथे आले होते. यावेळी शेख याने या मुलांची समजूत घालून थोड्याच दिवसांत तुम्हाला नियुक्तीपत्र मिळेल असे सांगितले होत. या तरूणांना मात्र नियुक्तीपत्र न मिळाल्याने त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात शेख याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पाचोरा पोलीसांनी तीन दिवसांपूर्वी वाळकी येथे येऊन शेख याच्यासह त्याची पत्नी व मुलाला ताब्यात घेतले.
शेख याने वाळकी येथील १५ तरूणांना नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. शेख याचा भंडाफोड झाल्यानंतर वाळकीच्या तरूणांनी त्याच्याकडून पैसे वसूल केले. बाहेरील जिल्ह्यातील मुलांचे पैसे मात्र अडकले. नगर तालुक्यातील विविध गावातील तरूणांकडून त्याने नोकरीच्या अमिषाने पैसे घेतले असल्याची माहिती समजते.

Web Title: A lot of people cheated by army subhedar in the Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.