Lok Sabha Election 2019: Together: Coordination in Ahmadnagar | Lok Sabha Election 2019 :काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या व्यासपीठावर : डॉ.सुजय विखे यांना विजयी करण्याचे केले आवाहन 
Lok Sabha Election 2019 :काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या व्यासपीठावर : डॉ.सुजय विखे यांना विजयी करण्याचे केले आवाहन 

अहमदनगर : काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी भाजप-युतीच्या समन्वय मेळाव्यात हजेरी लावत डॉ.सुजय विखे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. अहमदनगर येथे झालेल्या मेळाव्यात शेलार यांनी हे आवाहन केले. 
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर प्रथमच भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा नगर येथे आज पार पडला. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार अनिल राठोड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, अभय आगरकर आदी प्रमुख उपस्थित होते. कर्जत, जामखेड, नगर तालुका, पारनेर, श्रीगोंदा, राहुरी तालुक्यातून पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजप-शिवसेनेच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी आमदार कर्डिले यांनीही भाजपनेच आपल्याला सन्मान दिला त्यामुळे भाजपच्याच उमेदवारचे मनापासून काम करणार असे सांगितले.

 


Web Title: Lok Sabha Election 2019: Together: Coordination in Ahmadnagar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.