Lok Sabha Election 2019 :शिर्डीत तिरंगी लढत : माजी खासदार वाकचौरे रिंगणात : २०जण रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:42 PM2019-04-12T17:42:35+5:302019-04-19T15:09:20+5:30

शिर्डी लोकसभा निवडणुकीकरिता दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

Lok Sabha Election 2019: three candidate in Shirdi | Lok Sabha Election 2019 :शिर्डीत तिरंगी लढत : माजी खासदार वाकचौरे रिंगणात : २०जण रिंगणात

Lok Sabha Election 2019 :शिर्डीत तिरंगी लढत : माजी खासदार वाकचौरे रिंगणात : २०जण रिंगणात

Next

अहमदनगर : शिर्डी लोकसभा निवडणुकीकरिता दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता २० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. परिणामी नगरप्रमाणे शिर्डी मतदारसंघातही मतदानासाठी दोन ईव्हीएम मशीनची गरज भासणार आहे. शिर्डीत काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे सदाशिव लोखंडे व अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे असा तिरंगा सामना होत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण ३० जणांनी अर्ज दाखल केले होते. यातील दोन उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. त्यानंतर शुक्रवारी (दि. १२) अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत होती. त्यात दुपारी तीनवाजेपर्यंत आठ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता २० जण रिंगणात राहिले आहेत. शिर्डीसाठी २९ एप्रिलल मतदान होणार असून, २३ मे रोजी निकाल लागणार आहे.

रिंगणातील उमेदवार :
सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना), कांबळे भाऊसाहेब मल्हारी (काँग्रेस), बन्सी भाऊराव सातपुते (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), सुरेश एकनाथ जगधने (बहुजन समाज पार्टी), अशोक जगदीश जाधव (राष्ट्रीय मराठा पार्टी), प्रकाश कचरु आहेर (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), विजय ज्ञानोबा घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना), संजय लक्ष्मण सुखदान (वंचित बहुजन आघाडी), अ‍ॅड. अमोलिक गोविंद बाबूराव (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), किशोर लिंबाजी रोकडे (अपक्ष), गणपत मच्छिंद्र मोरे (अपक्ष), प्रदीप सुनील सरोदे (अपक्ष), बापू पाराजी रणधीर (अपक्ष), बोरगे शंकर हरिभाऊ (अपक्ष), भाऊसाहेब जयराम वाकचौरे (अपक्ष), भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (अपक्ष), सचिन सदाशिव गवांदे (अपक्ष), सुभाष दादा त्रिभुवन (अपक्ष), संपत खंडू समिंदर (अपक्ष).

माघार घेतलेले उमेदवार
डॉ. अरुण प्रभाकर साबळे
क्रांती अरुण साबळे
गायकवाड अशोक रामचंद
बागूल भूमिका आशिष
राजेंद्र रत्नाकर वाघमारे
प्रकाश गुलाब वाघमारे
सदाशिव रामचंद्र वाकचौरे
सरोदे अंबादास लक्ष्मण (सर्व अपक्ष)

Web Title: Lok Sabha Election 2019: three candidate in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.