Lok Sabha Election 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अहमदनगरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:19 AM2019-04-08T11:19:25+5:302019-04-08T11:21:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ येत्या शुक्रवारी (ता़ १२) नगर शहरात सभा होणार आहे़

Lok Sabha Election 2019: Prime Minister Narendra Modi on Friday in Ahmednagar | Lok Sabha Election 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अहमदनगरमध्ये

Lok Sabha Election 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अहमदनगरमध्ये

googlenewsNext

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ येत्या शुक्रवारी (ता़ १२) नगर शहरात सभा होणार आहे़ सभा सकाळी ९़ ३० वाजता येथील संत निरंकारी भवन शेजारी असलेल्या मैदानात होत आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी रविवारी दिली़
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यभर विभागनिहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे़ उत्तर महाराष्ट्रातील सभा पुढील आठवड्यात होत आहे़ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा नगर शहरात होत आहे़ काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ़ सुजय भाजपकडून निवडणूक लढवित आहेत़ विखे यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडविला़ त्यामुळे महाराष्ट्रातील पवार व विखे परिवारातील वाद पुन्हा उफाळून आला असून, त्यावर मोदी काय बोलतात, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे़

Web Title: Lok Sabha Election 2019: Prime Minister Narendra Modi on Friday in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.