Lok Sabha Election 2019 : काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष मीच : अण्णासाहेब शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:13 PM2019-03-22T13:13:35+5:302019-03-22T13:13:37+5:30

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. मी जिल्हाध्यक्ष पदाचा अद्याप राजीनामा दिला नाही.

Lok Sabha Election 2019: District President of Congress Mech: Annasaheb Shelar | Lok Sabha Election 2019 : काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष मीच : अण्णासाहेब शेलार

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष मीच : अण्णासाहेब शेलार

Next

श्रीगोंदा : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. मी जिल्हाध्यक्ष पदाचा अद्याप राजीनामा दिला नाही. मला काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून काही नियुक्तीपत्र आली आहेत. मला जिल्हाध्यक्ष पदाचा कोणी राजीनामा मागितला नाही. त्यामुळे मीच काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, असा दावा काँग्रसचे मावळते जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
शेलार म्हणाले, आम्ही सुजय विखे यांच्यासाठी नगरची जागा सोडावी म्हणून मागणी केली. पण राज्य पातळीवरील नेत्यांनी विखे घराण्याशी वैर धरून सुडाचे राजकारण केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मी समर्थक आहे. त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर विखे यांना मानणा-या कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासमवेत पक्ष प्रवेश केला. परंतु, मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेस पक्षात आहे. आम्ही राष्ट्रवादी उमेदवाराचे काम करणार नाही. आम्ही राष्ट्रवादी उमेदवाराचे काम केले तरी आमच्यावर कोण विश्वास ठेवणार नाही, असेही शेलार म्हणाले.

 

Web Title: Lok Sabha Election 2019: District President of Congress Mech: Annasaheb Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.