प्रवरा कॅम्पस्मध्ये बिबट्या घुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:23 AM2019-03-13T11:23:59+5:302019-03-13T11:24:47+5:30

लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कॅम्पसमध्ये बिबट्याने मंगळवारी दुपारी धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात कॅम्पस्चे तीन कर्मचारी जखमी झाले.

Leopard enters Pravara campus | प्रवरा कॅम्पस्मध्ये बिबट्या घुसला

प्रवरा कॅम्पस्मध्ये बिबट्या घुसला

Next

लोणी : लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कॅम्पसमध्ये बिबट्याने मंगळवारी दुपारी धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात कॅम्पस्चे तीन कर्मचारी जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्ट हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची संस्था आहे.
लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथील लोणटेक देवी मंदिराच्या वनराईमधून मंगळवारी दुपारी चार वाजता अचानक एका बिबट्याने आतमध्ये प्रवेश केला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या बिबट्याने १० ते १५ मिनिटे धुमाकूळ घातला. बिबट्याने या ठिकाणी कार्यरत असलेल्या अक्षय भानुदास दशवंते (रा. वरवंडी, ता. राहाता), नाना चंद्रभान भोसले (रा.दुर्गापूर), बाबासाहेब गंगाधर कदम (लोणी) यांच्यावर हल्ला केला. अक्षय दशवंते यांच्या डाव्या पायाला, नाना भोसले यांच्या उजव्या हाताला तर बाबासाहेब कदम यांच्या दोन्ही हाताला चावा घेतला आहे. हल्ल्यानंतर बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला.घटनेची माहिती कळताच प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. जयराज, पंजाबराव आहेर यांनी जखमींना त्वरित उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Leopard enters Pravara campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.