मुळा नदीतून जायकवाडीला पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:52 PM2017-10-16T16:52:05+5:302017-10-16T16:53:34+5:30

Leaving water from the river Mula to Jaayakwadi | मुळा नदीतून जायकवाडीला पाणी सोडले

मुळा नदीतून जायकवाडीला पाणी सोडले

Next

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा धरणातून नदीपात्राव्दारे पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाकडे २ हजार ५१७ द.ल.घ.फू. पाण्याचा विसर्ग झाला आहे. पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाण्याची आवक घटली आहे.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या मुळा धरणाचे दरवाजे यंदा परतीच्या पावसामुळे दोनदा उघडावे लागले. धरणाकडे कोतूळ येथून ११५८ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोतूळ येथे यावर्षी ८४४ मिलिमीटर तर मुळानगर येथे ६०२ मि.मी.पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने २० ते २४ आॅक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. मुळा नदीतून सध्या २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी पात्रातील डिग्रस, मांजरी, मानोरी, वांजुळपोई येथे पहिल्या टप्प्यात फळ्या टाकण्यात आल्या आहेत. पाऊस उघडल्याने मंगळवारी पाण्याचा विसर्ग कमी करण्याची शक्यता आहे. नदीतून पाणी वाहिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

विहिरींची पाणी पातळी वाढली

मुळा नदी पात्रातून पाणी वाहून गेल्यामुळे नदी काठ परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली. नदी पात्र परिसरात मुख्य पीक ऊस असल्याने पुढील महिन्यात उसाच्या लागवडी वाढण्याची शक्यता आहे. मुळा धरण भरल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Leaving water from the river Mula to Jaayakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.