पिण्याचे पाणी मागत दागिन्यासह एक लाखाचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 06:05 PM2018-11-21T18:05:48+5:302018-11-21T18:06:04+5:30

तालुक्यातील पश्चिम भागातील बहादराबाद शिवारातील कोपरगाव- संगमनेर रोडलगत असलेल्या सुनिल मारुती पाचोरे यांच्या रहात्या घरी बुधवार (दि.२१) रात्री साडेबारा ते दिडच्या दरम्यान

Lack of a lacquer with the demand of drinking water for jewelery | पिण्याचे पाणी मागत दागिन्यासह एक लाखाचा ऐवज लुटला

पिण्याचे पाणी मागत दागिन्यासह एक लाखाचा ऐवज लुटला

googlenewsNext

कोपरगाव : तालुक्यातील पश्चिम भागातील बहादराबाद शिवारातील कोपरगाव- संगमनेर रोडलगत असलेल्या सुनिल मारुती पाचोरे यांच्या रहात्या घरी बुधवार (दि.२१) रात्री साडेबारा ते दिडच्या दरम्यान चोरट्यांनी पिण्याचे पाणी मागण्याचे नाटक करून घरात प्रवेश करत संपुर्ण घराची उचकापाचक करून सोन्याच्या दागीन्यासह रोख रक्कम असे अंदाजे एक लाख रुपयाची चोरी केल्याची घटना घडली आहे.
बहादराबाद येथील सुनिल पाचोरे हे पत्नी व मुलासह कोपरगाव-संगमनेर रस्त्याला आपल्या शेतात राहतात. बुधवारी(दि.२१) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आमचा अपघात झाला. आम्हाला पाणी द्या असा आवाज खिडकीतून आला म्हणुन मदतीच्या भावनेतून सुनिल पाचोरे यांनी पाणी हातात घेउन दरवाजा उघडला. अचानक चार पाच जण घरात शिरले. त्यांनी सुनिल यांना चाकुचा धाक दाखवत दोघंनी एका ठिकाणी बसविले. एकाने पोटाला चाकू लावून धरला व एकाणे गळ्यास विळी लावुन धरली तर सुनिल यांच्या पत्नीस दमबाजी करत जागेवर बसवुन संपुर्ण उचकापाचक करुन घरातील दागीने तसेच रोख रक्कम अशी अंदाजे एक लाख रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे. सुमारे तासभर चोरटे या ठिकाणीच होते. चोरट्यांनी चोरी करून जातांना पाचोरे यांच्या घराचा दरवाजा बाहेरुन लावुन घेतला. घटनास्थळी शिर्डी पोलीस ठाण्यातील अधिका-यांनी भेट दिली असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

Web Title: Lack of a lacquer with the demand of drinking water for jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.