कोपरगावच्या नगराध्यक्षांची पदरमोड करुन दिला सफाई कामगारांना अतिरिक्त मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:14 PM2017-10-19T17:14:54+5:302017-10-19T17:16:44+5:30

Kopargaon municipal president parsed and gave extra compensation to the clean workers | कोपरगावच्या नगराध्यक्षांची पदरमोड करुन दिला सफाई कामगारांना अतिरिक्त मोबदला

कोपरगावच्या नगराध्यक्षांची पदरमोड करुन दिला सफाई कामगारांना अतिरिक्त मोबदला

googlenewsNext

कोपरगाव : नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत बुधवारी सफाई कामगारांची बैठक घेतली. कचरा उचलणा-यास प्रत्येकी २०० रूपयांप्रमाणे वहाडणे यांनी स्वत: पदरमोड करून अतिरिक्त कामाचा मोबदला दिल्याने कामगारांना दिवाळी भेट मिळाली.
नगरपालिकेने ‘आस्था’ या संस्थेला घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका दिला होता. वर्षभर काम करून ऐन दिवाळीत ठेकेदार घंटागाड्या घेऊन अचानक निघून गेला. त्यामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता वाढून कचरा साचला. या संदर्भात ‘लोकमत’ने ‘दिवाळीत कोपरगावकरांची कचरा कोंडी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत बुधवारी सकाळी वहाडणे यांनी आरोग्य निरीक्षक पी.एम. चव्हाण यांच्या समवेत ठेकेदाराच्या सफाई कामगारांची पालिकेत बैठक घेतली. त्यांना दिवसभर कचरा उचलण्याचे आवाहन करून स्वत:च्या खिशातून प्रत्येकी २०० रूपयांचा अतिरिक्त कामाचा मोबदला दिला. रात्री दहा वाजेपर्यंत शहर स्वच्छतेचे काम सुरू होते. वहाडणेंच्या दातृत्वाने सणाच्या पूर्वसंध्येला सफाई कामगारांना दिवाळी भेट मिळाली आहे.

शहरात रोज १५-१६ मेट्रिक टन कचरा

शहरात दररोज १५-१६ मेट्रिक टन कचरा संकलित होतो. नगरपालिकेचे एकूण ११८ तर ठेकेदाराचे ११५ सफाई कामगार आहेत. पालिकेच्या १० घंटागाड्या, १ डंपर व २ ट्रॅक्टरद्वारे कचरा उचलला जातो. सर्व घंटागाड्यांना जी. पी. आर. एस. प्रणाली बसविली जाणार आहे.


शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग वापरल्या जातात. त्यामुळे गटारी तुंबतात. जनावरे कॅरीबॅगा खाऊन मरतात. १ जानेवारीपासून शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून १० हजार कापडी पिशव्या वाटल्या जातील. लोकहिताच्या या उपक्रमास व्यापारी महासंघाची साथ मिळाली आहे.
- विजय वहाडणे, नगराध्यक्ष

Web Title: Kopargaon municipal president parsed and gave extra compensation to the clean workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.