कोकमठाण शिवारात टँकर धडकेने पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:13 PM2018-06-11T17:13:42+5:302018-06-11T17:13:42+5:30

भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने मोटारसायकलला पाठिमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना नगर-मनमाड रोडवरील कोकमठाण शिवारात सोमवारी दुपारी घडली.

In the Kokamthan Shivar, a husband and wife killed by a tanker in a tinker was killed | कोकमठाण शिवारात टँकर धडकेने पती-पत्नी ठार

कोकमठाण शिवारात टँकर धडकेने पती-पत्नी ठार

Next

कोपरगाव : भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने मोटारसायकलला पाठिमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना नगर-मनमाड रोडवरील कोकमठाण शिवारात सोमवारी दुपारी घडली.
बाळासाहेब ज्ञानदेव घोंगते (वय ५२) व पत्नी शोभा बाळासाहेब घोंगते ( वय ४५)अशी अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. ते कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आहेत. हे पती-पत्नी राहाता येथे नवजात नातवाला बघण्यासाठी दुचाकीवरुन जात असताना नगर-मनमाड महामार्गावरील तीनचारी कोकमठाण शिवारात मागून येणा-या रसायनाने भरलेल्या टँकरने (क्रमांक आर.जे.-१९, जी.सी.-८९७७ ) जोराची धडक दिली. यात पती-पत्नी जागीच ठार झाले. घटनास्थळी तत्काळ रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा दाखल झाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. टँकर पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: In the Kokamthan Shivar, a husband and wife killed by a tanker in a tinker was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.