खडकवाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यानेच फोडली पाइपलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 8:59pm

पाणी पुरवठा करणा-या कर्मचा-यानेच दारूच्या नशेत मुख्य पाइपलाइनचे वॉल तोडल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. या कृत्यामुळे कर्मचा-यांविरुध्द मंगळवारी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीने पाइपलाइन दुरुस्त करून व नवीन रोहित्र बसवून पाणी पुरवठा सुरळीत करुनही राजकीय कुरघोडी करीत पाणी पुरवठा करणा-या कर्मचा-यानेच दारूच्या नशेत मुख्य पाइपलाइनचे वॉल तोडल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. या कृत्यामुळे कर्मचा-यांविरुध्द मंगळवारी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. खडकवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी मांडओहळ नदीपात्रातून स्वजलधारा योजना व मुख्यमंत्री पेयजल योजनेतून दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गावठाण व वाडी वस्त्यांसाठी करण्यात आल्या आहेत. यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यामधील राजकीय दुफळीमुळे उपाय काढता आला नाही. या पाणी टंचाईमुळे अंघोळीसाठी व टॉयलेटसाठी पाणी नसल्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा असून तीव्र पाणीटंचाईमुळे विद्यार्थ्यांचे व रुग्णांचे हाल होत आहेत. मांडओहळ नदीपात्रातून येणा-या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत पाण्याचे कनेक्शन घेतल्याने गावठाणात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

गेल्या दोन महिन्यापासून ग्रामपंचायत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील आठवड्यात नवीन रोहित्र बसविण्यात आले. नवीन मोटार बसविण्यात आली. हे सर्व करीत असताना पाणीपुरवठा करणा-या कर्मचा-याने २५ डिसेंबर रोजी मुख्य पाइपलाइनचे वॉल तोडले. त्यामुळे पाणी येत नव्हते. त्यामुळे आम्ही त्या कर्मचा-यावर कारवाई केली. राजकीय कुरघोडी करून गाव वेठीस धरून माता-भगिनींना त्रास होईल असे कृत्य कोणी करू नये. -ज्ञानदेव गागरे, उपसरपंच, खडकवाडी.

संबंधित

सव्वा कोटींचा पी.एफ.गायब : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती
नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे माजी अध्यक्ष सुवालाल गुंदेचा यांचे निधन 
राहाता तालुक्यात चाळीस मृत श्वान आढळले, पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे ग्रामस्थांचे बोट
मराठवाड्याला पाणी देण्यास नगरच्या शेतकऱ्यांचा विरोध
सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पॅसेंजर सुरळीत

अहमदनगर कडून आणखी

पाण्याअभावी शेवंती सुकली !
श्रीरामपुरात भरदिवसा घरफोडी : हजारोंचा माल लंपास
राहुरीत हुमणीबाधीत ऊसासह राष्ट्रवादीचा तहसीलवर मोर्चा
शासनाने थकवले बोंडअळीचे अनुदान
आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भाग्यश्री फंडची निवड

आणखी वाचा