पत्रकार मारहाण प्रकरण : राहुरीतील हल्लेखोरांवर मोक्कानुसार कारवाई करा : अहमदनगर प्रेस क्लबची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 01:43 PM2019-03-21T13:43:53+5:302019-03-21T18:31:09+5:30

लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यावर संघटीत गुन्हेगारी चालविणा-यांनी केलेला हल्ला हा भ्याड असून या सर्व आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करण्याची मागणी अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली

Journalist Attack Case: Take action on the perpetrators of Ahmadnagar Press Club: Demand for Ahmednagar Press Club | पत्रकार मारहाण प्रकरण : राहुरीतील हल्लेखोरांवर मोक्कानुसार कारवाई करा : अहमदनगर प्रेस क्लबची मागणी

पत्रकार मारहाण प्रकरण : राहुरीतील हल्लेखोरांवर मोक्कानुसार कारवाई करा : अहमदनगर प्रेस क्लबची मागणी

googlenewsNext

अहमदनगर : लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यावर संघटीत गुन्हेगारी चालविणा-यांनी केलेला हल्ला हा भ्याड असून या सर्व आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करण्याची मागणी अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. येवले यांच्यावर हल्ला करणा-या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासित करतानाच जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी उपअधीक्षक दर्जाच्या अधिका-याची समिती गठीत केली जाईल आणि त्यावर तातडीने निर्णय घेतले जातील, असेही पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी स्पष्ट केले.

( व्हिडिओ पाहण्यासाठी येथे भेट  https://www.facebook.com/LokmatNagar/videos/310628436519775/)
राहुरीचे पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर राहुरीमध्ये झालेल्या प्राणघातक हल्याचा निषेध आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधिक्षक ईशू सिंधू यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष व नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के, लोकमत आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, सकाळचे निवासी संपादक अ‍ॅड. बाळ ज. बोठे, महाराष्ट्र टाइम्सचे ब्युरो चिफ विजयसिंह होलम, समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी, लोकसत्ताचे मोहनीराज लहाडे, पुढारीचे ब्युरो चिफ कैलास ढोले, नगर टाइम्सचे संपादक संदीप रोडे, नगर स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते, सचिव मुरलीधर कराळे, सुधीर मेहता, गणेश शेंडगे, मिलिंद देखणे, विक्रम बनकर, साहेबराव कोकणे, बाबा ढाकणे, सुर्यकांत नेटके, संजयकुमार पाठक, मयुर नवगिरे, राजू खरपुडे, सतिष रासकर, अनिल चौधरी, शिरीष शेलार, दत्तात्रय उनवणे, संदीप गाडे, सागर आनंदकर, अभिजित निकम, बबलू शेख, सिध्दार्थ दिक्षित, शरद कासार, शब्बीर सय्यद, सुशील थोरात, मुकुंद भट, राजेंद्र येंडे, निखील चौकर, रियाज शेख, दत्ता इंगळे, संदीप कुलकर्णी, सुर्यकांत वरकड, प्रदीप पेंढारे, प्रतिक शिंदे, समीर दाणी, कुणाल जायकर, विजय मते, रियाज पठाण, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अरुण वाघमोडे, अण्णा नवथर, सुदाम देशमुख, गोरख देवकर, शरद मेहेकरे उपस्थित होते.

( व्हिडिओ पाहण्यासाठी येथे भेट  https://www.facebook.com/LokmatNagar/videos/310628436519775/)
प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी प्रास्ताविक करताना नगरच्या पत्रकारीतेची गौरवशाली परंपरा विषद केली. राहुरीतील पत्रकार धक्कादायक असून तेथे गुंडमवाल्यांचे राज्य असल्याकडे लक्ष वेधले. राहुरीतील या सर्व आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करा अशी मागणीही यावेळी शिर्के यांनी केली. लोकमतचे सुधीर लंके यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला आणि गेल्या काही वर्षात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांचा पुढे काय तपास झाला हे समजत नसल्याने याबाबत आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. बाळ ज. बोठे पाटील यांनी पत्रकारांवर होणारे असे भ्याड हल्ले निषेधार्ह असल्याचे स्पष्ट केले. महेंद्र कुलकर्णी यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सुधीर मेहता यांनीही भूमिका मांडली.
( व्हिडिओ पाहण्यासाठी येथे भेट  https://www.facebook.com/LokmatNagar/videos/310628436519775/)

हल्लेखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करताना अधिस्वीकृतीधारक पत्रकार जामिनदार घ्या - शिवाजी शिर्के
पत्रकारांवरील वाढते हल्ले हे चिंताजनक असल्याचे पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या निदर्शनास आणून देतानाच पोलिस प्रशासनाकडून आता पत्रकारांच्या अपेक्षा वाढल्या असल्याकडे प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी लक्ष वेधले. राहुरीतील घटनेत पत्रकारावर हल्ला करणा-या आरोपींना मोक्का लावण्याची मागणी करतानाच या आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर जामिनावर सोडण्याआधी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करताना न्यायालयीन अधिकार प्राप्त असणा-या गुन्हे शाखेच्या निरीक्षकांनी या सर्व आरोपींना कलम ११० नुसार अधिस्वीकृतीधारक पत्रकार देण्याची अट टाकावी अशी मागणी अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी केली. प्रत्येक आरोपीसाठी नगर जिल्ह्यातील दैनिकाचा स्वतंत्र अधिस्वीकृतीधारक पत्रकार जामिनासाठी या आरोपींनी दिला तरच त्यांचा जामिन करावा अशी मागणीही श्री. शिर्के यांनी केली. पत्रकारावर हल्ला केला तर त्याची किंमत किती मोजावी लागते हे दाखवून देण्याची आता वेळ आली असून राहुरीतील या हल्लेखोरांना कोणत्याही पत्रकाराने जामिन होऊ नये अथवा त्यांची हमी घेऊ नये असे आवाहन अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी यावेळी केले.

( व्हिडिओ पाहण्यासाठी येथे भेट  https://www.facebook.com/LokmatNagar/videos/310628436519775/)

Web Title: Journalist Attack Case: Take action on the perpetrators of Ahmadnagar Press Club: Demand for Ahmednagar Press Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.