पत्रकार मारहाण प्रकरण : शेवगावमध्ये पोलिस निरीक्षकांना दिले निवदेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 01:08 PM2019-03-21T13:08:37+5:302019-03-21T13:11:03+5:30

राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना काल जबर मारहाण करण्यात आली.

Journalist Attack Case: Investigation given to the Police Inspector in Chevgaon | पत्रकार मारहाण प्रकरण : शेवगावमध्ये पोलिस निरीक्षकांना दिले निवदेन

पत्रकार मारहाण प्रकरण : शेवगावमध्ये पोलिस निरीक्षकांना दिले निवदेन

Next

शेवगाव : राहुरीमध्ये ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना काल जबर मारहाण करण्यात आली. या घटनेचे पडसाद कालपासूनच जिल्हाभर उमटू लागले आहे. मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या घटनेचा पत्रकारांनी निषेध केला. यावेळी पत्रकार शाम पुरोहित, नीलकंठ कराड, रमेश चौधरी, कैलास बुधवंत, सचिन सातपुते, विजय धनवडे, संजय भालेकर, आलिम शेख, रविंद्र मडके, नानासाहेब चेडे, संदीप देहाडराय, भगवान देशपांडे, इसाक शेख यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Journalist Attack Case: Investigation given to the Police Inspector in Chevgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.