आर्मीत नोकरीचे आमिष; नगर जिल्ह्यातील दहा तरूणांना लाखो रुपयांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:19 PM2017-11-09T15:19:43+5:302017-11-09T15:23:30+5:30

लष्करात सिव्हील क्लार्क पदावर नोकरी लावून देतो असे सांगत पिता-पुत्रांनी नगर तालुक्यातील दहा तरूणांकडून लाखो रूपये घेत त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कारभारी पंढरीनाथ खोमणे (वय ५९) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलीप गोविंद हुलगुंडे व भालचंद्र दिलीप हुलगुंडे (रा़ डिफेन्स कॉलनी, नगर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

Job lures in the army; Tens youth in the Nagar district millions of rupees loot | आर्मीत नोकरीचे आमिष; नगर जिल्ह्यातील दहा तरूणांना लाखो रुपयांचा गंडा

आर्मीत नोकरीचे आमिष; नगर जिल्ह्यातील दहा तरूणांना लाखो रुपयांचा गंडा

Next

अहमदनगर: लष्करात सिव्हील क्लार्क पदावर नोकरी लावून देतो असे सांगत पिता-पुत्रांनी नगर तालुक्यातील दहा तरूणांकडून लाखो रूपये घेत त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कारभारी पंढरीनाथ खोमणे (वय ५९) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलीप गोविंद हुलगुंडे व भालचंद्र दिलीप हुलगुंडे (रा़ डिफेन्स कॉलनी, नगर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
लष्करात अधिकारी असून, वरिष्ठ अधिका-यांची चांगली ओळख आहे असे सांगत दिलीप हुलगुंडे व त्याचा मुलगा भालचंद्र यांनी निबोंडी येथील कारभारी खोमणे यांचा विश्वास संपादन केला़ तुमच्या मुलास आर्मीत सिव्हील क्लार्क पदावर नोकरी लावून देतो असे सांगितले. यासाठी खोमणे यांच्याकडून हुलगुंडे पिता-पुत्रांनी गेल्या दोन वर्षात सहा लाख रूपये घेतले. त्यानंतर अशाच पद्धतीने आर्मीत नोकरीचे आमिष दाखवून हुलगुंडे याने चिचोंडी पाटील येथील दत्ता बाबासाहेब खडके, निंबोडी येथील अभिजित नाथा बेरड, लक्ष्मण साहेबराव इंगळे, सतीश भागीनाथ खोमणे, सोन्याबापू पाराजी गवळी यांच्याकडून पैसे घेतले़ त्यानंतर केकती (ता नगर) येथील अंशाबापू द्वारकानाथ खोमणे, काशिनाथ पाटीलबा इंगळे, दीपक भाऊसाहेब खोमणे तर जेऊर येथील अजय दिगंबर मगर यांच्याकडून त्यांच्या नातेवाईकांना तर काही तरूणांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पैसे घेतल्याचे खोमणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड हे करत आहेत.

Web Title: Job lures in the army; Tens youth in the Nagar district millions of rupees loot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.