जामखेड नगरपरिषद : नगरपरिषद पोटनिवडणूकीसाठी ७८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 07:05 PM2019-06-23T19:05:54+5:302019-06-23T19:06:50+5:30

नगरपरिषदेच्या प्रभाग १४ च्या पोटनिवडणूकीसाठी चुरशीने ७८ टक्के मतदान झाले आहे. निवडणूकीसाठी भाजप, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रिंगणात असून

Jamkhed Municipal Council: 78 percent voter turnout for municipal polls | जामखेड नगरपरिषद : नगरपरिषद पोटनिवडणूकीसाठी ७८ टक्के मतदान

जामखेड नगरपरिषद : नगरपरिषद पोटनिवडणूकीसाठी ७८ टक्के मतदान

googlenewsNext

जामखेड : नगरपरिषदेच्या प्रभाग १४ च्या पोटनिवडणूकीसाठी चुरशीने ७८ टक्के मतदान झाले आहे. निवडणूकीसाठी भाजप, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रिंगणात असून शिवसेना अपक्ष व एक भाजपचा बंडखोर रिंगणात उतरले असून लढत चौरंगी होत आहे. चारही उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रचार केला असल्याने निकालाचे गणित बदलणार आहे. भाजपला जागा राखण्यासाठी इतर तीन उमेदवाराचे मोठे आव्हान आहे.
पोटनिवडणूकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. खर्डा चौक व महादेव गल्ली असे दोन बुथ असून मतदार संख्या १४२८ इतकी आहे. चारही प्रमुख उमेदवारांनी सकाळी ईव्हीएम मशीनची पुजा करून मतदानास सुरवात केली. शनिवारी पडलेल्या पावसामुळे सकाळी मतदानाचा वेग कमी होता. नऊच्या सुमारास मतदार घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली. दोन्ही बुथवर ठराविक अंतरावर चारही उमेदवाराचे समर्थक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुरवातीला मतदानास निरुत्साह असला तरी त्यानंतर मात्र चुरशीने मतदान होऊ लागले. मतदान घडवून आणण्यासाठी उमेदवाराचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते.
मतदान केंद्र असलेल्या खर्डा चौक उर्दू शाळा बुथवर ५६० मतदान झाले त्यामध्ये महिला २६८ तर २९२ पुरुषांनी मतदान केले. तर महादेव गल्ली येथील जिल्हा परिषद शाळेतील खोलीतील बुथवर एकूण ५५७ मतदारांनी मतदान केले. यामध्ये महिला २१७ तर पुरुष २८० यांनी मतदानाचा हक्क बजावला.
१४२८ पैकी १११७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अखेर ७८.७ टक्के झाले आहे.
विद्यमान उपनगराध्यक्ष फरिदा खान यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग १४ मधील नगरसेवक पदासाठी पोटनिवडणुकीत होत आहे. या मतदारसंघात एकूण १४२८ मतदार असून ७५० च्या आसपास मुस्लिम समाजाचे मतदान आहे. त्या खालोखाल इतर समाज ४५० तर मागासवर्गीय समाजाचे २२८ मतदान आहे. जातीच्या समिकरणावरून प्रमुख राष्ट्रीय पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारीचे वाटप केले आहे. लोकसभा निवडणूकीनंतर तालुक्यातील भाजप सेना युती झाली नाही. सेनेने उमेदवारीचा आग्रह केला होता परंतु भाजपने साथ न दिल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीत रंगत आणली आहे.
निवडणुकीत पाच उमेदवार रिंगणात आहेत. शेख जाकीया आयुब भाजपा, शेख परवीन सिराजोद्दीन काँग्रेस तर शिवसेना तालुका प्रमुख संजय काशिद यांची पत्नी रोहीणी काशिद अपक्ष तसेच बाजार समितीचे संचालक सागर सदाफुले यांच्या मातोश्री व जामखेड ग्रामपंचायतच्या माजी सदस्या मैनाबाई ज्ञानदेव सदाफुले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष गुंदेचा यांच्या पत्नी छाया संतोष गुंदेचा हे निवडणूक रिंगणात आहेत. परंतु शेवटच्या दोन दिवस अगोदर त्यांनी शिवसेना उपक्ष उमेदवार रोहिणी काशीद यांना पाठिंबा दिला आहे.

Web Title: Jamkhed Municipal Council: 78 percent voter turnout for municipal polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.