तालुका समितीमार्फत बोगस प्रमाणपत्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 04:57 PM2018-06-16T16:57:51+5:302018-06-16T16:57:51+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी बदली व बदली टाळण्यासाठी सादर केलेले पुराव्यांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तालुक्यातील शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून मंगळवारपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी शुक्रारी दिला.

Inspection of bogus certificates by taluka committee | तालुका समितीमार्फत बोगस प्रमाणपत्रांची तपासणी

तालुका समितीमार्फत बोगस प्रमाणपत्रांची तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षक बदली प्रकरण: ५१५ शिक्षकांचे पुरावे बोगस असल्याचा संशय

अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी बदली व बदली टाळण्यासाठी सादर केलेले पुराव्यांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तालुक्यातील शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून मंगळवारपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी शुक्रारी दिला.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या राज्यस्तरावरून आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या आहेत. संवर्ग १ व २ मध्ये बदली व बदली टाळण्यासाठी पुरावे मागविण्यात आले होत. जिल्ह्यातील ५१५ शिक्षकांनी सादर केलेले पुरावे संशास्पद असल्याचे जिल्हास्तरीय तपासणीत समोर आले आहे.  या तपासणीचा अहवाल शिक्षण विभागाने तालुक्यांना फेरतपासणासाठी पाठविलेला आहे. अहवालातील संशास्पद असलेल्या पुराव्यांची तपासणी करण्यासाठी गटशिक्ष अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, यांची समिती स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला आहे.  शिक्षकांना नव्याने पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, नव्याने दिलेले पुरावे व आॅनलाईन पुरावे, यांची खात्री करून अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने समिती नियुक्त करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील बोगस प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची मागणी संघाच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने समिती नियुक्तीचे आदेश दिले असून,अन्यायग्रस्त व विस्थापित शिक्षकांना यामुळे न्याय मिळेल. राजेंद्र निमसे, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ

 

Web Title: Inspection of bogus certificates by taluka committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.