अवैध दारूची वाहतूक पकडली : १ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 02:51 PM2018-09-21T14:51:02+5:302018-09-21T14:51:17+5:30

चारचाकी वाहनातून अवैधरित्या दारुची वाहतूक करणा-या आरोपीसह १ लाख १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला.

Illegal liquor was seized: 1 lakh in possession of ammunition | अवैध दारूची वाहतूक पकडली : १ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

अवैध दारूची वाहतूक पकडली : १ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Next

अहमदनगर : चारचाकी वाहनातून अवैधरित्या दारुची वाहतूक करणा-या आरोपीसह १ लाख १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला.
सविस्तर माहिती अशी, चारचाकी वाहनातून अवैध दारु वाहतूक व विक्री होत असल्याची माहिती विभागाला मिळाली. त्यानंतर गुरुवारी दुपारी नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे या ठिकाणी पथकाने सापळा रचला. यावेळी अवैध गावठी दारू वाहतुक व विक्री करणा-या चारचाकी (क्र-एम.एच-१६ एबी - १८५८) वाहनाचा तीन किलोमीटरप् ााठलाग करून आरोपीला पकडण्यात आले. त्यामधील मच्छिंद्र छबू गव्हाणे यास ताब्यात घेतले. तर त्याच्याकडून १ लाख १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क अहमदनगरचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक-२ चे निरीक्षक धनंजय लगड, कॉन्स्टेबल प्रविण साळवे, बी. एम. चत्तर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

Web Title: Illegal liquor was seized: 1 lakh in possession of ammunition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.