राज्यातील बारा लाख बेघरांना देणार घर; देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 09:26 PM2018-01-01T21:26:14+5:302018-01-01T21:27:13+5:30

प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यातील १२ लाख बेघरांना हक्काचे घर देण्यात येणार आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मार्चअखेर देण्यात येणार आहे. हमीभावाने शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्याशिवाय कोणतेही खरेदी केंद्र बंद केले जाणार नाही, याबाबत जिल्हाधिका-यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Home to 12 lakh homeless people in the state; Devendra Fadnavis | राज्यातील बारा लाख बेघरांना देणार घर; देवेंद्र फडणवीस

राज्यातील बारा लाख बेघरांना देणार घर; देवेंद्र फडणवीस

Next

अहमदनगर : प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यातील १२ लाख बेघरांना हक्काचे घर देण्यात येणार आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मार्चअखेर देण्यात येणार आहे. हमीभावाने शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्याशिवाय कोणतेही खरेदी केंद्र बंद केले जाणार नाही, याबाबत जिल्हाधिका-यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जामखेड तालुक्यातील हळगाव येथे अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचे भूमिपूजन सोमवारी (दि. १) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले़ यावेळी जलसंधारण मंत्री प्रा़ राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, विभागीय आयुक्त महेश झगडे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ के  पी. विश्वनाथा, जिल्हाधिकारी अभय महाजन आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कुकडीच्या पाण्याचे पुनर्वाटप करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल़ त्याशिवाय निळवंडे धरणाच्या कामासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेतून राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यातील ८०० गावांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. हळगाव येथे ६५ कोटी रुपयांचे कृषी महाविद्यालय उभे करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जामखेड येथील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री कर्जत येथे आले. कर्जतमध्ये राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी चषक स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Home to 12 lakh homeless people in the state; Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.