Hivre Bazar's Patterns Exemplary: Arvind Singh | हिवरे बाजारचा दृष्टीकोन अनुकरणीय : अरविंद सिंह
हिवरे बाजारचा दृष्टीकोन अनुकरणीय : अरविंद सिंह

ठळक मुद्देउत्तराखंडच्या मुख्य सचिवांची हिवरेबाजाला भेट

केडगाव : आदर्शर्गाव हिवरे बाजार मधील ग्रामस्थांचा दृष्टीकोन व त्या प्रति आपले समर्पण इतरांसाठी निश्चित अनुकरणीय आहे असे मत उत्तराखंड राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य सचिव अरविंद सिंह यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत काढले.
उत्तराखंड सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने आयोजित केलेल्या अभ्यास दौ-या निमित्ताने या शिष्ठमंडळाने हिवरे बाजारला भेट दिली.या दौ-यामध्ये १८ वरिष्ठ अधिकारी सामील होते त्यांनी हिवरे बाजार मध्ये झालेल्या जलसंधारण कामाची पहाणी करून गावाने केलेले पाणी व पिकाचे नियोजन अभ्यासले. उत्तराखंडमध्ये तेथील भौगोलिक परिस्थीचा उपयोग करून व लोकांच्या सहभागातून विकास प्रक्रिया मजबूत करण्याच्या हेतूने या दौ-याचे आयोजन केले होते.सिंह पुढे म्हणाले पोपटराव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लोकांचा सहभाग व गरजेनुसार सरकारी योजनांचा घेतलेला लाभ त्यातून सर्वांगीण विकासाने स्वयंपूर्ण झालेले हे गाव इतरांना प्रेरणादायी व अनुकरणीय झाले आहे.सरकारच्या प्रयत्नांना ग्रामस्थांची साथ असेल तर देशातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास या गावाला भेट दिल्यावर मिळाला.
हे गाव नेहमीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.या शिष्ठमंडळामध्ये एस.एस.बिष्ट, जि.एस.रावत, डी.आर.जोशी, पि.के जोशी या आय.ए.एस. अधिका-यां बरोबर इतरही अधिकारी सामील होते.संपूर्ण विकास कामांची माहिती ग्रामसेवक सचिन थोरात तसेच रो.ना.पादीर यांनी दिली व पाहुण्यांचे स्वागत केले.

 


Web Title: Hivre Bazar's Patterns Exemplary: Arvind Singh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.