महापालिकेचा नगरमधील पाच धार्मिक स्थळांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:13 PM2017-11-13T12:13:13+5:302017-11-13T12:17:36+5:30

रस्त्याला अडथळा ठरणारी व रस्त्याच्या कडेला असलेल्या पाच अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेने शनिवारी (दि. ११) मध्यरात्री हातोडा घातला. दोन मंदिरे पाडताना स्थानिकांनी त्याला विरोध केला, मात्र पाचही ठिकाणची कारवाई शांततेत पार पडली.

Hammer on five religious places in ahmednagar by municipal corporation | महापालिकेचा नगरमधील पाच धार्मिक स्थळांवर हातोडा

महापालिकेचा नगरमधील पाच धार्मिक स्थळांवर हातोडा

Next

अहमदनगर : रस्त्याला अडथळा ठरणारी व रस्त्याच्या कडेला असलेल्या पाच अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेने शनिवारी (दि. ११) मध्यरात्री हातोडा घातला. दोन मंदिरे पाडताना स्थानिकांनी त्याला विरोध केला, मात्र पाचही ठिकाणची कारवाई शांततेत पार पडली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईला आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.११) रात्री सुरूवात झाली. केडगावसह बसस्थानक परिसरातील पाच मंदिरांवर हातोडा घातला.
दोन ठिकाणी स्थानिकांनी कारवाईला विरोध केला. मात्र, नगररचना विभागाच्या तपासणी नंतरच कारवाई होत असल्याचे अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितल्याने कारवाई फत्ते झाली.
रस्त्याला अडथळा ठरणाºया १९६० नंतरच्या धार्मिक स्थळांवर मागील आठवड्यात कारवाईला सुरूवात झाली. त्यात शिवाजीनगर-कल्याण रोड, बालिकाश्रम रस्ता व सावेडी उपनगरांतील ७ मंदिरांवर कारवाई झाली. या कारवाईनंतर हिंदुत्ववादी संघटना, नगरसेवक, अनेक स्थानिकांनी आक्षेप घेतल्याने कारवाई थंडावली होती. शनिवारी रात्री अचानकपणे महापालिकेने ही कारवाई पुन्हा सुरू केली.
शनिवारी मध्यरात्री सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, मनपा उपायुक्त विक्रम दराडे, अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे, प्रभाग अधिकारी नाना गोसावी, अशोक साबळे, अंबादास सोनवणे, जितेंद्र सारसर यांच्यासह पोलीस आणि महपालिका कर्मचारी यांच्या पथकाने केडगाव गाठले. केडगाव-नेप्ती रोडवरील शितळादेवी व म्हसोबा मंदिरांवर एकाच वेळी हातोडा टाकला.
सोनेवाडी रस्त्यावरील शितळादेवी मंदिर हटविण्यात आले. यावेळी स्थानिकांनी कारवाईला विरोध केला. काहीवेळ त्यांची व महापालिका कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली.
पोलिसांनी हस्तक्षेप करून मंदिरातील मूर्ती ताब्यात घेतल्या व मंदिर हटविले. केडगाव देवी मंदिराजवळील लक्ष्मी माता मंदिर हटविण्यात आले. येथेही स्थानिकांनी विरोध केला. आतापर्यंत शहरातील १६ मंदिरांवर कारवाई झाली असून, आणखी ५२ मंदिरांवरही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Hammer on five religious places in ahmednagar by municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.