ग्रासरूट इनोव्हेटर : ट्रॅक्टरवर चालणारे पीक टोकन यंत्र शेतकऱ्यांमध्ये ठरले लोकप्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:46 PM2018-12-15T12:46:47+5:302018-12-15T12:54:41+5:30

हे यंत्र वापरण्यासाठी अत्यंत सोपे व सुटसुटीत आहे. 

Grassroot Innovator: The peak token device running on tractors was popular among the farmers | ग्रासरूट इनोव्हेटर : ट्रॅक्टरवर चालणारे पीक टोकन यंत्र शेतकऱ्यांमध्ये ठरले लोकप्रिय

ग्रासरूट इनोव्हेटर : ट्रॅक्टरवर चालणारे पीक टोकन यंत्र शेतकऱ्यांमध्ये ठरले लोकप्रिय

googlenewsNext

- अनिल लगड (अहमदनगर)

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी सुधारित यंत्रे विकसित केली आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रणामात होत आहे. अशाच प्रकारे विद्यापीठाने ट्रॅक्टरवर चालणारे अनेक पिकांची पेरणी व लागवड करणारे टोकन यंत्र विकसित केले असून शेतकऱ्यांमध्ये हे यंत्र लोकप्रिय ठरत आहेत.

आजकाल शेतीसाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. मजूर शोधता शोधता शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत असल्याचे चित्र सद्यपरिस्थितीत राज्यभरात दिसत आहे. जे मजूर मिळतात त्यांची मजूरी जास्त असल्याने आर्थिक तोटा होतो. मजूरांअभावी शेतीची नांगरणी, कोळपणी पेरणी आदी विविध कामे खोळंबून अडचणी निर्माण होतात. यामुळे सधन शेतकरी जवळपास यांत्रिक पद्धतीने शेती करण्याचा खटाटोप करतात. यात ट्रॅक्टरवर आधारित यंत्रांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. 

विद्यापीठाने तयार केलेल्या या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, गहू, ज्वारी, हरभरा, तूर या पिकांची टोकन पद्धतीने पेरणी करता येते. दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार योग्य खोलीवर आणि बियाणांच्या बाजूला देता येते. या यंत्रात २२.५ सेंटिमीटर अंतरावरील पिकांसाठी ९ ओळी, ३० से. मी. अंतरावरील पिकांसाठी ७ ओळी आणि ४५ सेंटिमीटर अंतरावरील पिकासाठी ५ ओळी एकाच वेळेस पेरता येतात. शिफारशींप्रमाणे दोन ओळीतील अंतर आणि दोन रोपांतील अंतर योग्य पद्धतीने राखता येते. प्रत्येक फणाच्या बियाणांच्या पेट्या वेगळ्या असल्यामुळे तुरीसाठी आंतरपिकांची टोकनसुद्धा करता येते. हे यंत्र ३५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरवर चालते. जवळपास एका दिवसात ३ ते ३.५ हेक्टर क्षेत्रावर टोकन पद्धतीने पेरणी करता येते. या यंत्रासाठी शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. हे यंत्र वापरण्यासाठी अत्यंत सोपे व सुटसुटीत आहे. 

Web Title: Grassroot Innovator: The peak token device running on tractors was popular among the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.