‘सरकार शेतक-यांना स्वयंपूर्ण करणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 03:42 PM2017-08-15T15:42:37+5:302017-08-15T15:49:24+5:30

अहमदनगर येथील पोलीस परेड मैदानावर स्वातंत्र्यदिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते झाला.

'Government will do self-sufficiency of farmers' | ‘सरकार शेतक-यांना स्वयंपूर्ण करणार’

‘सरकार शेतक-यांना स्वयंपूर्ण करणार’

Next

अहमदनगर : केवळ कर्जमाफीच नाही तर कृषीपूरक योजनांच्या माध्यमातून शेतकºयांना बळकटी देत त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण, राजशिष्टाचार तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
येथील पोलीस परेड मैदानावर स्वातंत्र्यदिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे, जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. त्यानंतर विविध परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना, तसेच विशेष कामगिरी केलेल्या पोलिसांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या 'आपला जिल्हा अहमदनगर' या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, संदीप निचीत, साधना सावरकर, तहसीलदार गणेश मरकड आदींसह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्याा संख्येने उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Web Title: 'Government will do self-sufficiency of farmers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.