शेतकऱ्यांची सरकारला ४६४ रु. भीक, मुख्यमंत्र्यांना मनीआॅर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:26 AM2019-02-08T05:26:48+5:302019-02-08T05:27:16+5:30

शेतक-यांच्या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने सुरू केलेल्या ‘देता का जाता’ आंदोलनादरम्यान गुरुवारी पुणतांब्याच्या शेतकºयांनी सरकारसाठी झोळीत भीक मागितली.

The government of the farmers Rs. 464 Money, Money Order to Chief Minister | शेतकऱ्यांची सरकारला ४६४ रु. भीक, मुख्यमंत्र्यांना मनीआॅर्डर

शेतकऱ्यांची सरकारला ४६४ रु. भीक, मुख्यमंत्र्यांना मनीआॅर्डर

Next

शिर्डी  - शेतकºयांच्या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने सुरू केलेल्या ‘देता का जाता’ आंदोलनादरम्यान गुरुवारी पुणतांब्याच्या शेतकºयांनी सरकारसाठी झोळीत भीक मागितली. यामध्ये जमा झालेले ४६४ रुपये मनीआॅर्डरद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविले. चौथ्या दिवशी अन्नत्याग करणाºया शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावली आहे. आंदोलन मागे घ्यावे यासाठी शिष्टाई करण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे पुणतांब्यात दाखल झाले आहेत.

शेतीमालाला हमीभाव मिळावा, संपूर्ण कर्जमाफी करावी यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने सरकारच्या निषेधार्थ रथयात्रा काढली आहे. त्यास पाठिंबा देत पुणतांबा येथील निकिता जाधव, शुभांगी जाधव, पूनम जाधव या कृषिकन्यांसह काही महिलांनी ४ दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. चौथ्या दिवशी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी केली.

आंदोलनादरम्यान शुभांगी जाधव हिची रक्तातील साखर कमी होऊन प्रकृती ढासळल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने प्रशासनास कळविले. राहात्याचे तहसीलदार माणिक आहेर व पोलीस निरीक्षक परदेशी यांनी भेट देऊन जाधव हिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र मागण्या मान्य होऊन आंदोलनाला यश मिळत नाही, तोवर तिने उपचारांस नकार दिला आहे.

चार दिवसांपासून अन्नत्याग

पुणतांबा येथील शेतकºयांच्या चार मुलींनी चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकºयांचा सातबारा कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या, दुधाला ५० रुपये प्रतिलीटर भाव आदी मागण्यांसाठी आंदोलन आहे. किसान क्रांती संघटनेच्या बॅनरखाली सदरचे आंदोलन आहे. किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांची कन्या निकीता या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. ३ जून २०१७ रोजी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. पुणतांबा गावातून ‘देता की जाता’असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर यात्रा सुरु आहे. त्याच आंदोलनाचा दुसरा भाग म्हणून पुणतांबामधील कृषिकन्या आक्रमक झाल्या आहेत.

Web Title: The government of the farmers Rs. 464 Money, Money Order to Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.