प्रेयसीच्या मुलीवर प्रियकराचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 06:15 PM2018-06-23T18:15:06+5:302018-06-23T18:15:40+5:30

विवाहीत महिलेच्या प्रियकराने तिच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. मोबाईलमध्ये पिडीत मुलीचे अश्लील फोटो काढत याबाबत कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने पिडीत मुलीस दिली.

Girlfriend's daughter tortured | प्रेयसीच्या मुलीवर प्रियकराचा अत्याचार

प्रेयसीच्या मुलीवर प्रियकराचा अत्याचार

Next

संगमनेर : विवाहीत महिलेच्या प्रियकराने तिच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. मोबाईलमध्ये पिडीत मुलीचे अश्लील फोटो काढत याबाबत कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने पिडीत मुलीस दिली. या प्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादिवरून भाऊसाहेब मनोहर सोनवणे (संगमनेर) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पिडीत मुलीची आई शिक्षिका असून तिचे वडील आजारी असल्याने मुळगावी राहतात. तर शिक्षण घेते व तिचा भाऊ शिक्षणासाठी परगावी असतो. पिडीत मुलगी इयत्ता सहावीत शिक्षण घेत असताना आरोपी भाऊसाहेब सोनवणे पिडित मुलीच्या घरी येत होता. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईची सोनवणे यांची ओळख होवून त्याचे रूपांतर दोघांच्या प्रेमात झाले. याचा फायदा घेत सोनवणे हा मुलीच्या आईकडे पैशाची मागणी करायचा.
२०१४ साली मुलगी नववीत शिक्षण घेत असताना सोनवणे याने मुलीवर अत्याचार करीत तिचे अश्लील फोटो काढले. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास तुझ्यासह तुझ्या आईचीही बदनामी करण्याची धमकी त्याने मुलीस दिली. यानंतर त्याने पाच ते सहा वेळा मुलीवर अत्याचार केले. माझ्या व आईच्या असहाय्य पणाचा फायदा घेत वेळोवेळी सोनवणे याने त्रास दिल्याचे पिडीत मुलीने फिर्यादित म्हटले आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस कॉँस्टेबल सचिन उगले करीत आहेत.

 

Web Title: Girlfriend's daughter tortured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.