अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:04 PM2019-06-19T12:04:29+5:302019-06-19T12:05:22+5:30

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे़

girl tortured: The accused arrested | अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला अटक

Next

अहमदनगर : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ ४ आॅगस्ट २०१८ रोजी शहरातील दिल्लीगेट येथील पार्किंगमध्ये ही घटना घडली़ याबाबत १५ जून रोजी रात्री पीडित मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे़
शुभम ज्ञानदेव सुडके (रा़सातपुते तालीम नालेगाव,नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे़ पीडित अल्पवयीन मुलगी आणि शुभम यांच्यात २०१६ पासून प्रेमसंबंध होते़ काही दिवसानंतर मात्र शुभम हा सदर मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला़ या मारहाणीमुळे या मुलीला दोनवेळा हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले होते़ ४ आॅगस्ट २०१८ रोजी पीडित मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलाच्या मोटारसायकलवरून जात होती़
यावेळी आरोपी सुडके याने या दोघांना अडवून येथील क्लेराब्रुस शाळेच्या मैदानात नेले़ तू दुसºया तरुणाच्या गाडीवर का फिरतेस असे म्हणून शुभम याने मुलीस मारहाण केली़ त्यानंतर तिला जबरदस्तीने त्याच्या पोलो कारमध्ये बसविले़ कार एमआयडीसी, औरंगाबाद रोड परिसरात फिरवून दिल्ली गेट येथील पार्किंगमध्ये आणली़ तेथेही शुभम याने तिला मारहाण करत रात्री तिच्यावर शारीरिक अत्याचार केला़ त्यानंतर दुसºया दिवशी शुभम याने पीडित मुलीस तिच्या घरी सोडले़ या घटनेबाबत कुठे काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी त्याने मुलीस दिली़
पीडित मुलीने ही बाब तिच्या आईस सांगितली़ त्यानंतर पीडित मुलगी व तिच्या आईने शुभम याच्या घरी जाऊन ही बाब सांगितली तरी शुभम याच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे़

शुभम सुडके हा पीडित मुलीच्या नातेवाईकांनाही त्रास देत होता़ चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार मारहाण करत होता़ गुन्हा दाखल करण्याच्या पंधरा दिवस आधी शुभम याने पीडित मुलीस नेप्ती चौक येथे प्रकरण मिटविण्यासाठी बोलावून घेतले़ तेथेही त्याने मुलीस मारहाण केली़ अखेर या मारहाणीला कंटाळून पीडित मुलगी व तिच्या आईने चाईल्ड लाईन संस्थेची मदत घेत शुभम सुडके याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़

Web Title: girl tortured: The accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.