काम बंद पाडणा-यांची दादागिरी मोडीत काढू : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 06:48 PM2019-02-24T18:48:37+5:302019-02-24T18:49:54+5:30

निळवंडे कालव्याचे काम विरोधकांनी ५० वर्ष झुलवत ठेवले़ युती शासनाच्या काळात निळवंडे धरणाच्या कामाला गती आली असून उजव्या कालव्याचे एक दिवसही काम बंद पडू दिले जाणार नाही़

 Gaurish Mahajan: Let's stop the work of demolishing democracy | काम बंद पाडणा-यांची दादागिरी मोडीत काढू : गिरीश महाजन

काम बंद पाडणा-यांची दादागिरी मोडीत काढू : गिरीश महाजन

Next

राहुरी : निळवंडे कालव्याचे काम विरोधकांनी ५० वर्ष झुलवत ठेवले़ युती शासनाच्या काळात निळवंडे धरणाच्या कामाला गती आली असून उजव्या कालव्याचे एक दिवसही काम बंद पडू दिले जाणार नाही़ माथ्यावरच्या आंदोलकांचा प्रश्नही येत्या १५ दिवसात मार्गी लावला जाईल़ मात्र दादागिरी करून काम बंद पाडणा-यांची दादागिरी सरकार मोडीत काढेल, असा इशारा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिला़
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याच्या कामाचा शुभारंभ कणगर येथे रविवारी महाजन यांच्या हस्ते झाला. तांभेरे येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते़ मंत्री महाजन पुढे म्हणाले, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे़ कामासाठी लागणारा पैसा कमी पडू दिला जाणार नाही. काँग्रेसच्या आघाडी सरकारने खरकटे ठेवलेली कामे पूर्ण करण्याचा युती सरकारने सपाटा लावला आहे़ पाणी सोडण्याचे अधिकार संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

मंत्र्यांच्या सभेत शेतकºयांनी झळकावले फलक
मंत्री गिरीष महाजन भाषणासाठी उभे राहिले असता निळवंडेचे पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणा शेतक-यांनी फलक हातात घेऊन सुरू केल्या. मंत्र्यांनी हस्तक्षेप करीत त्यासाठीच मी इथे आलो आहे़ कालव्याला कुणी आडवे आले तर वेळप्रसंगी मी काम सुरू करण्यासाठी येईल. निवडणूक आली म्हणून मी आलो नाही़ काळजी करू नका, असा दिलासा दिल्यानंतर घोषणाबाजीला पूर्णविराम मिळाला़

 

Web Title:  Gaurish Mahajan: Let's stop the work of demolishing democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.