Gas stolen from school | शाळेतून गॅसच्या टाकीची चोरी
शाळेतून गॅसच्या टाकीची चोरी

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून चोरट्यांनी दरवाजा तोडून गॅस सिलिंडर व इतर साहित्य चोरून नेले. मंगळवारी रात्री ही घटना घडली.
चोरट्यांनी शाळेचा दरवाजा तोडून प्रवेश केला व विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाच्या साठ ताटल्या, तीस किलो तुरडाळ, खाद्यतेल आदी साहित्य तसेच गॅस सिलिंडर चोरुन नेले. सध्या शाळांना उन्हाळी सुट्टी आहे. मुख्याध्यापक अंबादास काकडे, उपशिक्षिका राणी धुमाळ यांच्या बदल्या झाल्या आहेत. शिक्षकांच्या बदल्या व सुट्यांचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंयंडा तोडल्याचे दिसून आले. शुक्रवारी (दि. १५) नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने शाळेच्या स्वच्छतेसाठी नवीन शिक्षक बुधवारी शाळेत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक पोपट शिंदे यांनी याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 


Web Title: Gas stolen from school
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.