व्हॉटस्अ‍ॅपवर वाजू लागले गणेशोत्सवाचे ढोल

By admin | Published: July 14, 2014 10:55 PM2014-07-14T22:55:46+5:302014-07-15T00:46:46+5:30

अहमदनगर : यंदाच्या ११ दिवसांच्या गणेशोत्सवाला २९ आॅगस्टपासून प्रारंभ होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला विधानसभा निवडणुकीची किनार लागली आहे.

Ganeshotsav drum was started on the whitespace | व्हॉटस्अ‍ॅपवर वाजू लागले गणेशोत्सवाचे ढोल

व्हॉटस्अ‍ॅपवर वाजू लागले गणेशोत्सवाचे ढोल

Next

अहमदनगर : यंदाच्या ११ दिवसांच्या गणेशोत्सवाला २९ आॅगस्टपासून प्रारंभ होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला विधानसभा निवडणुकीची किनार लागली आहे. त्यामुळे फटाके, डीजे वाजविणाऱ्यांची धूम असणार आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी यंदा नऊ दिवस रात्री बारानंतर ध्वनिक्षेपक वाजविण्यास न्यायालयाने परवानगी दिल्याचा संदेश व्हॉटस् अ‍ॅपवरून फिरवला. या न्यायालयाच्या आदेशामुळे कोणाकोणाला ‘अच्छे दिन’ येणार याची यादीही सांगण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये पोलीस दलातील काही अधिकारी-कर्मचारी आघाडीवर होते.
गणेशोत्सवामध्ये दरवर्षी डीजे, ध्वनिक्षेपक यांची परवानगी आणि रात्री बारापर्यंत देखावे पाहण्यासाठी किती दिवस परवानगी द्यायची, याची चर्चा रंगते. त्यासाठी बैठकांवर बैठका होतात. मात्र यंदा दीड महिन्यापूर्वीच या डीजेबाबत चर्चा रंगत आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही माहिती व्हॉटस अ‍ॅपवर टाकून एकच खळबळ उडवून दिली. नेमकी ही बातमी कोणासाठी होती, त्यामध्ये तथ्य आहे की नाही, याची शहानिशा न करता फॉरवर्ड झाली. यंदाच्या गणेशोत्सवाला निवडणुकीची किनार असणार आहे. त्यामुळे उत्सवाला उधाण येणार आहे. गणेश मंडळासाठी घालून दिलेल्या काही अटी बरोबर असल्या तरी नऊ दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्याची कोणतीही परवानगी दिलेली नाही. तसेच कोणताही आदेश नसल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले.
असा होता मजकूर....
यंदा गणेशोत्सवामध्ये ९ दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास न्यायालयाने परवानगी दिली असून रात्री बारापर्यंत देखावे पाहता येतील. विसर्जन मिरवणुकीत रात्रभर वाद्य वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका मंडळाला ३ ते ४ पथके लावता येतील. सहा बेस असलेले ध्वनिक्षेपक वापरता येतील. २४ तासानंतर सगळ््यांना वाद्य वाजविणे बंद करावी लागतील. डीजेचे परवाने तपासण्यात येतील. फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. डीजेचा आनंद मात्र रात्रभर लुटता येईल. डीजे व्यावसायिकांना अच्छे दिन!..गणपती बाप्पा मोरया...! असा हा मजकूर आहे. या मजकुरामधील अन्य माहिती ही पोलीस खात्याने मंडळांना घालून दिलेले नेहमीचे नियम व अटी आहेत, त्याही व्हॉटस अ‍ॅपवर सोबत देण्यात आल्या होत्या.
गणेशोत्सवातील ९ दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देणारा कोणताही आदेश, न्यायालयाचा निकाल झालेला नाही. तसा कोणताही निर्णय माझ्यापर्यंत आलेला नाही. कोणीतरी व्हॉटस अ‍ॅपवर खोडसाळपणा केला आहे. व्हॉटस् अ‍ॅपवर आलेला सर्वच मजकूर खरा असतो असे काही नाही. त्यामुळे आलेल्या मजकुराची खात्री करूनच तो संदेश फॉरवर्ड करण्याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
-रावसाहेब शिंदे, पोलीस अधीक्षक

Web Title: Ganeshotsav drum was started on the whitespace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.