ढोल-ताशांच्या निनादात नगरमध्ये गणेश विसर्जन; डीजेसाठी नऊ मंडळाचा मिरवणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 12:59 PM2018-09-24T12:59:59+5:302018-09-24T13:00:33+5:30

गणेश विसर्जनात प्रशासनाने डीजेला बंदी केल्यामुळे गेल्या २५ वर्षात प्रथमच डिजेशिवाय गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. डीजेबंदीमुळे पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला.

Ganesh immersion of drum-cards; Nine board boycott boycott for DJ | ढोल-ताशांच्या निनादात नगरमध्ये गणेश विसर्जन; डीजेसाठी नऊ मंडळाचा मिरवणुकीवर बहिष्कार

ढोल-ताशांच्या निनादात नगरमध्ये गणेश विसर्जन; डीजेसाठी नऊ मंडळाचा मिरवणुकीवर बहिष्कार

Next

अहमदनगर : गणेश विसर्जनात प्रशासनाने डीजेला बंदी केल्यामुळे गेल्या २५ वर्षात प्रथमच डिजेशिवाय गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. डीजेबंदीमुळे पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला. सहा मंडळांनी प्रवरासंगम येथे जाऊन गणेश मुर्तींचे विसर्जन केले तर मानाच्या गणेश विशाल गणपतीसह इतर काही मंडळांनी ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिला. दरवर्षी बारापर्यंत चालणारी मिरवणूक यंदा नऊ वाजताच संपली.
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी केली होती. मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी, असा अट्टहास पोलिसांकडे धरला होता. पोलिसांनी नकार दिल्याने पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला. मिरवणुकीत विशाल गणपती, महालक्ष्मी, कपिलेश्वर दोस्ती, आदिनाथ व आनंद तरुण मंडळ हे सहभागी झाले होते. नवरत्न, समझोता, निलकमल, शिवशंकर, माळीवाडा व नवजवान तरुण मंडळ यांनी प्रवरासंगम येथे जाऊन गणेशमुर्तींचे विसर्जन केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सहा मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा गजर करत नऊ वाजेपर्यंत गणेशमुर्तीचे विसर्जन केले. दरम्यान सावेडी येथील तीन गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरामध्ये उत्साह आणि जल्लोषात साजरी झाली. विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

विशाल गणपतीची मिरवणूक लक्षवेधी

नगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीची मिरवणूक यंदाही नेहमीप्रमाणे लक्षवेधी ठरली. रविवारी सकाळी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेद यांच्या हस्ते पुजा होऊन विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. लेझीम ढोल, ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि गणरायाचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात हा मिरवणूक सोहळा रंगला. सात वाजेच्या दरम्यान विशाल गणपती विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.

Web Title: Ganesh immersion of drum-cards; Nine board boycott boycott for DJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.