संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

By admin | Published: July 7, 2016 11:12 PM2016-07-07T23:12:03+5:302016-07-07T23:27:29+5:30

संतप्त झालेल्या निवडुंगे ग्रामस्थांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात मोर्चा नेऊन दोन तास ठिय्या दिला.

A front of the angry villagers police station | संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

Next

पाथर्डी / तिसगाव : रविवारी रात्री निवडुंगे शिवारात अशोक हरिभाऊ मरकड यांच्या वस्तीवरील दरोड्यात रविवारी दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा गंभीर जखमी झालेला मुलगा प्रदीप याचे पुणे येथे औषधोपचार घेताना निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या निवडुंगे ग्रामस्थांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात मोर्चा नेऊन दोन तास ठिय्या दिला. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी निवडुंगेत चूल व गाव बंद पाळण्यात आला.
यावेळी अनेकांनी पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढीत आरोपींचा तातडीने शोध लावून त्यांच्यावर कारवाई करावी, न झाल्यास येत्या १४ जुलैस राष्ट्रीय महामार्गावर निवडुंगे येथे रास्ता रोको करण्याचा इशारा दिला.
पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो असून एलसीबीचे पथक तातडीने पाठवून या प्रकरणाचा छडा लावला जाईल असे मोर्चेकऱ्यांना सांगितले. पण मोर्चेकऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी जागेवरच ठिय्या दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारून या प्रकरणाचा तातडीने तपास लावण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चेकरी शांत झाले. आठ दिवसांपूर्वी भाउसाहेब जाधव यांच्या शेतातील वस्तीवर चोरटयांनी वृद्ध व लहान मुलांना मारहाण केली. दागिने व रोख रक्कम लंपास केली.
ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे पोलिसांसमोर पेच
या मोर्चात महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. मढी व तिसगांवचे ग्रामस्थही सहभागी झाले होते. आसाराम ससे, सेवा संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, चंद्रकांत मरकड, तिसगांवचे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब लवांडे, पाथर्डीचे माजी नगरसेवक बंडू बोरूडे ,सीताराम बोरूडे, अ‍ॅड.सतीश पालवे आदी सहभागी झाले होते. गुन्ह्याचा तपास लागेपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेत पोलीस अधीक्षक आल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता.
४रविवारची चोरीची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या इतर घटनांमुळे गांवकरी भयभीत आहेत. रात्री नागरिक भीतीमुळे झोपत नाहीत़ चोरांना पायबंद घालण्याऐवजी पोलीस ग्रामस्थांनाच आंदोलनापासून अटकाव करीत असल्याचा आरोप करीत पोलीस गस्त सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली़

Web Title: A front of the angry villagers police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.