बेलापूर- श्रीरामपूर रस्त्यावर तीन वाहनांच्या विचित्र भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:13 AM2017-12-14T11:13:47+5:302017-12-14T11:18:21+5:30

बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Five people die in a strange tragedy of three vehicles on Belapur-Shrirampur road | बेलापूर- श्रीरामपूर रस्त्यावर तीन वाहनांच्या विचित्र भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

बेलापूर- श्रीरामपूर रस्त्यावर तीन वाहनांच्या विचित्र भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

googlenewsNext

श्रीरामपूर : बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
मृतांमध्ये नितीन सोनवणे (वय २७), शिवा ढोकचौळे (वय २७, दोघेही रा. रांजणखोल, ता. राहाता), सचिन तुपे (वय २८), भारत मापारी (वय २७, दोघेही रा. भैरवनाथनगर, ता. श्रीरामपूर), सुभाष शिंदे (वय ३०, ब्राम्हणगाव वेताळ, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. तर पियुष पांडे (रा. भैरवनाथनगर) हा या अपघातात जखमी झाला आहे.
हे सर्व स्विफ्ट कारमधून (क्रमांक एमएच १७, एसी ९००९) वाढदिवसाच्या पार्टीसाठी देवळाली प्रवरा येथे गेले होते. तेथून ते परत येत असताना बेलापूर खुर्द येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने पलट्या घेत समोरुन येणा-या टँकरवर (क्रमांक एमएच ०४, आर ९६६६) आदळली. त्याचवेळी भरधाव वेगाने येणारी इंडिका कारही (एमएच १७, ६०५५) या कारवर येऊन आदळली. यात स्विफ्ट कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Five people die in a strange tragedy of three vehicles on Belapur-Shrirampur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.