दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 10:14 AM2018-07-13T10:14:30+5:302018-07-13T10:15:29+5:30

खडका फाटा ते सलाबतपूर रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना नेवासा पोलिसांनी रंगेहात पकडले.

Five people arrested for the robbery | दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना अटक

दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना अटक

Next

नेवासा : खडका फाटा ते सलाबतपूर रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना नेवासा पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून दरोड्याच्या साहित्यासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अटकेमध्ये सुजित भिकन देवकुळे (वय २६ रा.हरेगाव ता.श्रीरामपूर), संदीप एकनाथ ढगे (वय २६ रा.खोकर ता.श्रीरामपूर), रोहन विलास शिंदे (वय २५, रा.पंचशीलनगर, चाळीसगाव), अभिजित मधुकर जोंधळे (वय २५, रा.संगमनेर रोड श्रीरामपूर), दीपक बाबासाहेब शेटे (वय २३, रा.संजयनगर, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे.
नेवासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना सलाबतपूर रोडवर कारनजीक चार ते पाच जण चोरीच्या हेतूने बसल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे घटनास्थळी गेले असता सलाबतपूर रोडवरील आडवी चारीनजीक कार दिसून आली. कारनजीक पाच जणांच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चॉपर, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, दोऱ्या, सुतळी अ‍ॅटमबॉम्ब, डिझेल ड्रम, दोन मोबाईल, कार, कारमध्ये नंबर प्लेट व पाच मास्कसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर टोळीकडून भविष्यात घडणा-या अनेक गुन्ह्यांवर प्रतिबंध बसणार असून त्यांच्याकडून आणखी गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोर्डे यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Five people arrested for the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.