गांधी-नेहरू परिवाराच्या बदनामीप्रकरणी लोणीत युट्यूब चॅनेलविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 05:45 PM2018-04-19T17:45:55+5:302018-04-19T17:59:00+5:30

गांधी-नेहरू परिवारासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबाबत खोटी, निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एका यु ट्यूब चॅनेलविरूद्ध विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी लोणी (ता. राहाता) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Filed a complaint against the YouTube YouTube channel for defamation of Gandhi-Nehru family | गांधी-नेहरू परिवाराच्या बदनामीप्रकरणी लोणीत युट्यूब चॅनेलविरूद्ध गुन्हा

गांधी-नेहरू परिवाराच्या बदनामीप्रकरणी लोणीत युट्यूब चॅनेलविरूद्ध गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंची फिर्याद

लोणी(अहमदनगर) : गांधी-नेहरू परिवारासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबाबत खोटी, निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एका यु ट्यूब चॅनेलविरूद्ध विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी लोणी (ता. राहाता) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खोटे व्हिडीओ अपलोड करून दिवंगत मोतीलाल नेहरूंपासून ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापर्यंतच्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबाबत या चॅनेलवरून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. या चॅनेलने अपलोड केलेल्या एका व्हिडीओत काँग्रेस पक्ष व पक्षातील प्रमुख नेत्यांबाबत धादांत खोटी,निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारीत करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. अत्यंत हिन दर्जाची भाषा वापरून गांधी-नेहरू परिवाराची बदनामी केली जात आहे. त्यामुळे माझ्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकारातून देशासाठी अपूर्व योगदान देणाऱ्या थोर नेत्यांची प्रतिमा मलिन करून एकप्रकारे भारताचाही अवमान केला आहे. त्यामुळे हा एकप्रकारे देशद्रोहच ठरतो. त्यामुळे या चॅनेलविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे विखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद देताना विखे यांच्यासोबत माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, काँग्रेसचे राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, भगवंतराव विखे, किसनराव विखे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अनिल विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, संजय आहेर, नंदलाल राठी, सुभाष विखे, लक्ष्मण विखे, गणेश विखे, बंडू लगड, शिर्डी नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते.

या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात भादंवि १५३ अ, २९५ अ नुसार सामाजिक तेढ निर्माण करणे, धर्म, वंश, जन्मस्थान, निवास आदी कारणांवरून शत्रुत्व वाढविणे, कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याच्या कारणावरून या चॅनेलविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
-रणजीत गलांडे, पोलीस निरीक्षक, लोणी पोलीस ठाणे.


या चॅनेलने सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे हे य ुटयुब चॅनेल व त्यांचे फेसबुक पेज तातडीने हटविण्यात यावे. पोलीस प्रशासन व सरकारने याबाबत गांभीर्य न दाखविल्यास काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील.
-राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते, विधानसभा.

Web Title: Filed a complaint against the YouTube YouTube channel for defamation of Gandhi-Nehru family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.