चिमुकल्या मुलाला पित्याने लावलं भीक मागायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 03:24 PM2018-06-21T15:24:37+5:302018-06-21T15:24:37+5:30

व्यसनी पित्याने अवघ्या चार वर्षांच्या मुलाला दारू पाजून त्याला भीक मागायला भाग पाडले. ही बाब चाइल्ड लाइन संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या निर्दयी बापाच्या तावडीतून मुलाची सुटका करत त्याला बालगृहात भरती करण्यात आले.

The father of the little girl has begun to ask for begging | चिमुकल्या मुलाला पित्याने लावलं भीक मागायला

चिमुकल्या मुलाला पित्याने लावलं भीक मागायला

Next

अहमदनगर : व्यसनी पित्याने अवघ्या चार वर्षांच्या मुलाला दारू पाजून त्याला भीक मागायला भाग पाडले. ही बाब चाइल्ड लाइन संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या निर्दयी बापाच्या तावडीतून मुलाची सुटका करत त्याला बालगृहात भरती करण्यात आले.
या प्रकरणी सदर मुलाच्या वडिलाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कोठला बसस्थानक परिसरात १४ जून रोजी एक चार वर्षांचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती चाइल्ड लाइन संस्थेतील अलीम पठाण यांना मिळाली. पठाण यांच्यासह संस्थेतील प्राची सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन त्या मुलाची माहिती घेतली. तेव्हा त्याची व्यथा समोर आली. त्या मुलाचा पिता राजू वैरागर (रा़ पाथर्डी) हा तेथेच होता. 
पठाण व सोनवणे यांनी माहिती अधीक घेतली तेव्हा राजू वैरागार हा स्वत:च्याच मुलाला नशायुक्त पदार्थ पाजून जबरदस्तीने भीक मागायला लावत असल्याचे समोर आले. पठाण व सोनवणे यांनी मुलास व त्याच्या वडिलांना ताब्यात घेत तोफखाना पोलीस ठाणे येथे घेऊन जात असताना राजू वैरागर मध्येच पळून गेला. त्या मुलाला तोफखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे मात्र त्याची प्रकृती आणखी खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवस मुलावर उपचार करण्यात आले. प्रकृती ठिक झाल्यानंतर त्याला येथील बालगृहात दाखल करण्यात आले. त्या मुलाची आई त्याला सोडून गेलेली असून, केवळ वडिलांचाच आधार त्याला होता. मात्र त्याच्या वडिलांनीच त्याला भीक मागण्यास भाग पाडले.  या प्रकरणी अलीम पठाण यांच्या फिर्यादीवरून राजू वैरागर याच्या विरोधात मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The father of the little girl has begun to ask for begging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.