पारनेर तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 06:18 PM2018-06-13T18:18:24+5:302018-06-13T18:18:24+5:30

पारनेर तालुक्यातील पळशी येथील शेतक-याने कर्जाला कंटाळून घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

The farmer's suicide in the area of ​​Parner taluka bore debt | पारनेर तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

पारनेर तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

Next

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील पळशी येथील शेतक-याने कर्जाला कंटाळून घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
कारभारी उर्फ संजय बाबासाहेब खटाटे हे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. खटाटे यांची पळशी येथे जिरायत जमीन आहे. तीन ते चार वर्षापासून सततची नापीक व राष्ट्रीयकृत बँकेसह सेवा संस्था व पतसंस्थांचे ३ ते ४ लाख रुपयांचे थकलेले होते. त्यामुळे या थकीत कर्जाला कंटाळून खटाटे यांनी लोखंडी पाईपला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याबाबतची खबर मयताचा भाऊ विश्वनाथ बाबासाहेब खटाटे यांनी टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्रला दिली. मृतदेहाची टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.साळवे शेळके, सुरज नवले करीत आहेत.

Web Title: The farmer's suicide in the area of ​​Parner taluka bore debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.