संगमनेरमधील थोरात कारखान्याविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:34 PM2018-01-23T12:34:31+5:302018-01-23T13:56:15+5:30

ऊसदराच्या प्रश्नाबाबत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी आंदोलन सुरु करण्यात आले. कारखाण्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी ठिय्या दिला.

Farmers' agitation started in Sangamner Thorat factory | संगमनेरमधील थोरात कारखान्याविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरु

संगमनेरमधील थोरात कारखान्याविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरु

Next

संगमनेर : ऊसदराच्या प्रश्नाबाबत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी आंदोलन सुरु करण्यात आले. उसाला २३०० रुपयांपेक्षा अधिक भाव देता येणार नसल्याचे कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केल्यानंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
आंदोलक व कारखाना व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यात सोमवारी बैठक झाली. यात कारखाना व्यवस्थापनाने उसाला २३०० रुपयांपेक्षा अधिक भाव देता येणार नसल्याने स्पष्ट केले. त्यामुळे आज कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी घेतला.
आंदोलनामध्ये साहेबराव नवले, शरद थोरात, दीपक वाळे, बापूसाहेब गुळवे, अशोक सातपुते, संतोष रोहम, अ‍ॅड. अरुण इथापे, भास्करराव दिघे, वसंतराव देशमुख, साहेबराव वलवे, रावसाहेब डुबे आदि सहभागी झाले आहेत.  पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशद्वारावर अडवून धरले आहे. 

Web Title: Farmers' agitation started in Sangamner Thorat factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.