रोजगार हमी, नाही पगाराची हमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:21 PM2019-03-19T13:21:52+5:302019-03-19T13:25:07+5:30

दुष्काळामुळे आर्थिक अडचणीच्या संकटात सापडलेल्या संसाराला रोजगार हमीच्या कामामुळे आधार मिळाला खरा, पण तीन आठवडे काम होऊनही हाती पगार न आल्याने ‘रोजगार हमी, पण पगाराची नाही हमी’ असा अनुभव मजुरांना येतो आहे.

Employment Guarantee, No Paid Guarantee! | रोजगार हमी, नाही पगाराची हमी!

रोजगार हमी, नाही पगाराची हमी!

googlenewsNext

शेवगाव : दुष्काळामुळे आर्थिक अडचणीच्या संकटात सापडलेल्या संसाराला रोजगार हमीच्या कामामुळे आधार मिळाला खरा, पण तीन आठवडे काम होऊनही हाती पगार न आल्याने ‘रोजगार हमी, पण पगाराची नाही हमी’ असा अनुभव मजुरांना येतो आहे.
मिरी पांढरीपूल रस्त्यावरील आपेगाव ते आव्हाणे या दोन किलोमीटरच्या शीव रस्त्याचे काम रोजगार हमीतून सुरू आहे. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या कामावर ढोरजळगाव, मळेगाव, आपेगाव, आव्हाणे परिसरातील ३१० मजूर काम करीत आहेत. शारदा जनार्धन कोलते, सरला देविदास गिºहे, बाळासाहेब खवले, सुभद्रा विष्णू गिºहे, पांडुरंग दौलत तुजारे, परमेश्वर विष्णू केसभट आदी मजुरांच्या हातांना काम मिळाल्याने दिलासा मिळाला. कामाला तीन आठवडे लोटले तरी पगार न मिळाल्याने मजूर हताश झाले आहेच.
आमच्या सर्वांकडे जॉबकार्ड असल्याने सणासुदीसाठी बँक खात्यात पगाराचे पैसे जमा होणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, सावली आदी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.

पाण्यासाठी दाहीदिशा
पहाटे पाच वाजता आमचा दिवस उगवतो. गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे. पाण्याच्या टँकरचा प्रस्ताव दाखल केल्याचे गाव पुढारी सांगतात. मात्र अजून टँकर सुरू नसल्याने दूरवरून पाणी आणून घरादारातील अन्य सदस्यांच्या स्वयंपाकाची सोय लावून आमची भाकरी बरोबर घेऊन कामावर येतो. रात्रंदिवस आम्हाला रोजगाराच्या लढाईस तोंड द्यावे लागते, असे महिला सांगत होत्या.

पदवीधरालाही रोहयोचा आधार
४राम शिवाजी पाटेकर हा बी.ए. झालेला युवक रोजगार हमीवर काम करीत आहे. उन्हाळा संपताच पुढील उच्च शिक्षणासाठी जाणार असल्याचे त्याने सांगितले. ग्रामसेवक भगीरथ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली रामजी खोसे, दिगंबर साबळे, शिवाजी शेलार या मुकादमांच्या देखरेखीखाली शीव रस्त्याचे काम सुरु आहे.

मजुरांच्या कामाचे बिल बँकेत पाठविले आहेत. दोन दिवसात मजुरांच्या खात्यात पैसे जमा होतील. अ‍ॅपच्या अडचणीमुळे पगार लांबले.
- डॉ. विनोद भामरे, तहसीलदार, कर्जत

Web Title: Employment Guarantee, No Paid Guarantee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.