मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 04:39 PM2017-09-23T16:39:53+5:302017-09-23T16:40:03+5:30

मुळा धरणाचे सर्व ११ दरवाजे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता उघडण्यात आले़ ११ मो-यातून दोन हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याची माहिती धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़

Eleven doors of Mula dam opened | मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले

मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले

Next

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाचे सर्व ११ दरवाजे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता उघडण्यात आले़ ११ मो-यातून दोन हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याची माहिती धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़
२६००० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात २५ हजार ७०९ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली़ कोतूळ येथून १५१३ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे़ त्यामुळे ११ मो-यातून शनिवारी दुपारी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले़ यंदाच्या पावसाळयात कोतूळ येथे एकूण ७३४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे
 मुळानगर येथे शुक्रवारी १० मिलीमिटर पावसाची नोंद झाली़ यंदाच्या पावसाळयात मुळानगर येथे एकूण ५५२ मिलीमिटर पावसाची नोद झाली आहे़ गेल्यावर्षी २१ आगष्ट रोजी मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते़ यंदा मुळा धरण तीन आठवड्याने उशीरा भरले आहे़ मुळा नदी पात्रातून पाणी वाहू लागल्याने वाळू उपसा बंद पडला आहे़

Web Title: Eleven doors of Mula dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.