अंगावर विजेची तार पडून शेतक-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:58 PM2018-06-30T17:58:11+5:302018-06-30T17:58:21+5:30

धामोरी बुदु्रक येथे विजेची तार अंगावर पडून झालेल्या आपघातात नारायण रामभाऊ खुदळे वय-५९ यांचा मृत्यू झाला. बुधवारी (२७ जून) घडलेली घटना काल लक्षात आली.

Electric wire death due to electricity | अंगावर विजेची तार पडून शेतक-याचा मृत्यू

अंगावर विजेची तार पडून शेतक-याचा मृत्यू

googlenewsNext

वांबोरी : धामोरी बुदु्रक येथे विजेची तार अंगावर पडून झालेल्या आपघातात नारायण रामभाऊ खुदळे वय-५९ यांचा मृत्यू झाला. बुधवारी (२७ जून) घडलेली घटना काल लक्षात आली.
नारायण कुदळे हे शेतीच्या कामानिमित्त धामोरी येथे राहत होते. ऊसाच्या शेतात असलेल्या पाऊल वाटेने जात असल्याने कुदळे यांच्या अंगावर अचानक विजेची तार पडल्याने त्यांचे जागीच निधन झाले. ठिकाण एकांत असल्याने घटना लवकर कुणाच्याही लक्षात आली नाही. परीगाबाई दुधाट यांच्या शेतातून वास आल्यानंतर घटना लक्षात आली. पोलिस पाटील खंडू जाधव यांनी वांबोरी पोलिसांना यासंदर्भात माहीती दिली. पुढील तपास किरण बनसोडे करीत आहेत. 

 

Web Title: Electric wire death due to electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.