दुष्काळ आढावा बैठकीला अनुपस्थित राहिल्याने 12 बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 08:22 AM2019-05-19T08:22:16+5:302019-05-19T08:23:49+5:30

शेतकऱ्यांना दुष्काळाचे अनुदान वाटप संदर्भात जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी (17 मे) बोलविलेल्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने 12 बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Due to absence of drought review meeting, an FIR has been registered against 12 bank officials | दुष्काळ आढावा बैठकीला अनुपस्थित राहिल्याने 12 बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

दुष्काळ आढावा बैठकीला अनुपस्थित राहिल्याने 12 बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Next

अहमदनगर - शेतकऱ्यांना दुष्काळाचे अनुदान वाटप संदर्भात जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी (17 मे) बोलविलेल्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने 12 बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नायब तहसीलदार माधुरी संपतराव आंधळे यांनी शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सध्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानाचे कुठपर्यंत वाटप झालेले आहे. यासंदर्भात  आढावा घेण्यासाठी नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला  राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकार्‍यांना बोलाविण्यात आले होते मात्र तब्बल 11 बँकेच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीला दांडी मारल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नेहा जोशी (आंध्रा बँक) मंगेश कदम (इंडियन बँक) चरण दीप (ओरिएन्टल बँक), माने, (पंजाब नॅशनल बँक) जी.के. देशपांडे (युनियन बँक), सातपुते,    वसंत पिल्लेवार (देना बँक) गोविंद झा (विजया बँक), सुयोग ब्राह्मणे (युनायटेड बँक) धीरज (अलहादाबाद बँक) विकास निकाळजे (स्टेट बँक) 12. गायकवाड (अग्रणी बँक) यांचा समावेश आहे.

Web Title: Due to absence of drought review meeting, an FIR has been registered against 12 bank officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.