डझनभर गोल्ड पण प्रो-कबड्डीचे स्वप्न अधुरे : शिवछत्रपती पुरस्कारप्रास्त गौरव शेट्टीची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 06:09 PM2017-12-30T18:09:29+5:302017-12-30T18:12:47+5:30

सद्यस्थितीत माझ्याकडे डझनभर गोल्ड पदके आहेत पण वजन जादा असल्यान प्रो- कब्बडी खेळण्याचे स्वप्न अधुरे आहे. त्यासाठी वजन कमी करत असून लवकर यश येईल असा आत्मविश्वास गौरव जयराम शेट्टी याने व्यक्त केला.

Dozens of Gold, but dream of pro-kabadi is incomplete: Shiv Chhatrapati AwardPrash of Gaurav Shetty | डझनभर गोल्ड पण प्रो-कबड्डीचे स्वप्न अधुरे : शिवछत्रपती पुरस्कारप्रास्त गौरव शेट्टीची खंत

डझनभर गोल्ड पण प्रो-कबड्डीचे स्वप्न अधुरे : शिवछत्रपती पुरस्कारप्रास्त गौरव शेट्टीची खंत

Next
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेनिमित्त शेट्टी याने आपल्या भावना व्यक्त केल्या

बाळासाहेब काकडे
गोदड महाराज क्रीडानगरी
कर्जत : कबड्डीचा खेळ आमच्या परिवारात रुजलेला आहे. आई- वडील अन मला असे तीन शिवछत्रपती पुरस्कार घरात आहेत. मी २००६-२००७ ला भारतीय संघाकडून खेळलो त्यावेळी भारताला वर्ल्ड कप मिळाला. सद्यस्थितीत माझ्याकडे डझनभर गोल्ड पदके आहेत पण वजन जादा असल्यान प्रो- कब्बडी खेळण्याचे स्वप्न अधुरे आहे. त्यासाठी वजन कमी करत असून लवकर यश येईल असा आत्मविश्वास गौरव जयराम शेट्टी याने व्यक्त केला. कर्जत येथे सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेनिमित्त शेट्टी याने आपल्या भावना व्यक्त केल्या.


मुंबई शहराकडून खेळण्यासाठी गौरव कर्जतला आला आहे. त्यास शिवछत्रपती पुरस्कार मिळाला असून एशियन गेम मध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे. वजन जादा असूनही चपळाईने खेळ करत असल्याने रसिकांचा तो आयडॉल बनला आहे. गौरव शेट्टीे म्हणाला, माझे वडील जयराम हे उत्कृष्ट कब्बडी खेळत होते. त्यांनाही शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तर आई छाया हिलाही कबड्डीतील भरीव कामगिरीबद्दल शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला आहे. मलाही शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. त्यामुळे एकाच घरात तीन शिवछत्रपती अवॉर्ड असलेला आमचा परिवार आहे. १९९८ पहिल्यांदा १४ वर्षाखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा खेळलो आई - वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रवास सुरू आहे. माझे वजन १०० किलोच्या वर गेल्याने प्रो- कबड्डी खेळण्याची इच्छा अपुर्ण आहे. मी सहा महिन्यापासून वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आहे. दहा किलो वजन कमी केले आहे. आणखी दहा किलो वजन कमी करून प्रो-कबड्डीत एन्ट्री करणार असल्याचा विश्वास शेट्टी याने व्यक्त केला.

Web Title: Dozens of Gold, but dream of pro-kabadi is incomplete: Shiv Chhatrapati AwardPrash of Gaurav Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.