'आता मागे हटायचं नाही', 27 मार्चला मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 04:26 PM2019-02-13T16:26:37+5:302019-02-13T16:27:25+5:30

शेतकऱ्यांची झालेली लूट आम्ही परत मागत आहोत, ती कर्जमाफी नव्हे. उद्योगांची करमाफी व कर्जमाफी मिळून सरकारने 18 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली.

'Do not waste it back', Farmers' Front on the ministry on March 27, ajit nawale says | 'आता मागे हटायचं नाही', 27 मार्चला मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार

'आता मागे हटायचं नाही', 27 मार्चला मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार

Next

अहमदनगर : नाशिकमधून 20 पासून शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरू होईल. 27 ला तो मंत्रालयावर पोहोचेल. अद्यापही मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असा आरोप अजित नवले यांनी केला आहे. शहरी लोक म्हणतात, किती कर्जमाफी करायची. पण, त्यांना सांगा प्रत्येकवेळी शेतकरी लुटला गेला. शेतमालाचे भाव वाढले की सरकार भाव पाडते, कीटकनाशकांचा भाव सरकारला ठरविता येते नाही. पण सरकार शेतमालाचे भाव वाढले की हस्तक्षेप करते. यातून शेतकर्यांची लूट होत असल्याचेही अजित नवले यांनी म्हटले. 

शेतकऱ्यांची झालेली लूट आम्ही परत मागत आहोत, ती कर्जमाफी नव्हे. उद्योगांची करमाफी व कर्जमाफी मिळून सरकारने 18 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. त्यावर कोणी ओरडत नाही. त्यांना का कर्जमाफी म्हणून कोणी आक्षेप घेत नाही. मग, शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे का. एकाही उद्योजकाने आत्महत्या केली नाही. इकडे शेतकरी रोज मरत आहेत. शेतकरी आणि उद्योजक दोघेही भारताचे नागरिक आहेत. पण दोघांनाही वेगवेगळा न्याय का.?

आता, सरकारशी धोरणात्मक निर्णयाचा, न्यायालयीन लढाईचा आणि तिसरा टप्पा रस्त्यावरच्या लढाईचा असेल. आता, संपूर्ण कर्जमुक्तीशिवाय मागे हटायचे नाही. पॉलिहाऊस शेतकऱ्यांवर 10 लाख, 20 लाख, 40 लाख कर्ज आहे. सरकारने या शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमुक्ती देऊ केली. पण, उर्वरित कर्ज भरण्याची अट टाकली. म्हणजे आम्ही 10, 20 लाख भरायचे आणि दीड लाख घ्यायचे. ही सरकारची कर्जमुक्ती नाही कर्ज वसुली मोहीम सरकारने राबवली. जेव्हढे पैसे सरकारने कर्ज माफीत दिले नाहीत, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वसुली करून घेतली. आता मुख्यमंत्र्यांना सोडणार नाही, पूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असेही अजित नवले यांनी अहमदनगर येथील राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेत बोलताना म्हटले. 
 

Web Title: 'Do not waste it back', Farmers' Front on the ministry on March 27, ajit nawale says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.